ऋषितुल्य माजी आमदार आप्पासाहेब गोगटे जन्मशताब्दी समारोह !

देवगड,दि.१२ फेब्रूवारी
ऋषितुल्य माजी आमदार
आप्पासाहेब गोगटे यांची
जन्मशताब्दी वर्ष दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ ला सुरू
होत आहे. कै. आप्पा हे १९८५ ते २००४ असे सलग
२० वर्षे भारतीय जनता पार्टीचे आमदार होते. आप्पा हे
भारतीय जनता पार्टीचे आमदार असले तरी ते
सर्वसामान्य जनतेला आपले आमदार वाटत असत.
त्यामुळे आप्पांना देव मानणारा असा मोठा वर्ग
तत्कालीन देवगड मतदार संघात आहे. आप्पाना
मानणारा, आप्पां बरोबर काम केलेल्या कार्यकर्त्यांनी
आज रोजी एकत्र येऊन आप्पांची जन्मशताब्दी
धुमधडाक्यात साजरी करावी असे ठरविले आहे.
त्यानुसार दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी
१०.३० वाजता सांस्कृतिक भवन जामसंडे येथे
जन्मशताब्दी कार्यक्रमाचा शुभारंभ करावा असे निश्चित
करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी गुहागरचे
भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू तसेच माजी
आमदार प्रमोद जठार, बाळ माने आणि आमदार नितेश
राणे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच भारतीय
जनता पार्टी चे दोडामार्ग पासून वैभववाडी पर्यंत च्या
सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना आमंत्रित केलेले आहे. त्यामध्ये
माझी जिल्हाध्यक्ष विजयराव मराठे, शामकांत काणेकर
अभय सावंत, भाजप अध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे सह
यशवंत आठलेकर, विलास हडकर, अतुल काळसेकर
यांचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीमध्ये स्वर्गीय आप्पासाहेबांच्या जन्मशताब्दी
कार्यक्रम वर्षभर करावे आणि शेवटचा जन्मशताब्दीचा
कार्यक्रम | १५ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या प्रमाणावर साजरा
करावा असे ठरविण्यात आले
या बैठकीमध्ये स्वर्गीय अप्पासाहेबांच्या जन्मशताब्दीचे
कार्यक्रम वर्षभर करावे आणि शेवटचा जन्मशताब्दीचा
कार्यक्रम १५ फेब्रु २०२५ रोजी मोठ्या प्रमाणावर साजरा
करावा असे ठरविण्यात आले
या बैठकीला माजी आमदार अजित गोगटे, आपण ते
सुपुत्र प्रकाश गोगटे, आपण जे स्वीय सहाय्यक राजू
काळे देवगड मंडल अध्यक्ष किंजवडेकर चे माजी
मुख्याध्यापक अरुण सोमण सर, वैभव बिडये,
बाळासाहेब खडपे अंबा उत्पादक व्यवस्थापक संतोष
पाटकर जामसंडे सन मित्र मंडळाचे आजी माजी अध्यक्ष
सुभाष धुरी आणि राजा भुजबळ सदाशिव ओगले, शहर
प्रमुख योगेश पाटकर माधव कुलकर्णी माजी सभापती
भाई पारकर उषःकला केळुस्कर प्राजक्ता घाडी सुधीर
काळे धीरज बाणे ज्ञानेश्वर खवळे बापू जुवाटकर वैभव
करंगुटकर इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते