कणकवली दि.२८ फेब्रूवारी
खारेपाटण येथील शुकनदीत आंघोळीसाठी उतरलेल्या युवक बुडला. दिगंबर प्रकाश वाळके (28, रा. पिंगुळी-चिंदरकरवाडी, ता. कुडाळ) असे त्या युवकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी 26 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वा. वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांचे पथक ग्रामस्थांसह बुडालेल्या युवकाचा शोध घेत असून गुरवारी सायंकाळपर्यंत तो सापडून आलेला नाही. याबाबत अधिक वृत्त असे की, पिंगुळीतील दिगंबर वाळके व त्याचा मित्र राहुल वाघ (रा. सातारा) हे कारने कुणकेश्वर यात्रेसाठी गेले होते. यात्रेकरून ते परत येत होते. प्रवासदरम्यान खारेपाटण येथील शुकनदीच्या पात्रात लगत थांबले. त्यानंतर दिगंबर वाळके हा पाण्यात आंघोळ करायला गेला. मात्र, तो पुन्हा पाण्याच्या बाहेर आला नाही. याबाबतची माहिती राहुल वाघ याने खारेपाटण पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर खारेपाटण पोलीस दूरशेत्राचे पोलीस अधिकारी श्री. माने, पराग मोहिते, पोलीस पाटील दिगंबर भालेकर यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम राबवली. मात्र, बुडालेल्या युवकाचा सापडू आला नाही. रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवली. गुरुवारी पोलीस प्रशासनकडून बुडालेल्या युवकाच्या शोधसाठी स्पीड बोट मागविण्यात आली. त्यानंतर शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत तो युवक आढळून आलेला नाही. याबाबत रामचंद्र लवू वाळके (50, रा. पिंगुळी-चिंदरकरवाडी, ता. कुडाळ) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.