कासार्डेतील युवकाचा गेल्या अनेक वर्षांपासून स्तुत्य उपक्रम*
तळेरे,दि.१२ फेब्रूवारी
कासार्डे येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल नारायण चव्हाण (कासार्डे, ता. कणकवली) यांच्या मातोश्री श्रीम.सुवर्णा नारायण चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन अभिषेक मंगल कार्यालय, कासार्डे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपल्या आई वाढदिवस अनिल चव्हाण या युवकाने साजरा केला आहे.
याशिवाय अनिल चव्हाण व त्यांच्या मित्र मंडळीने असलदे दिविजा वृध्दाश्रमामधील आजीआजोबना
अन्नदान करुन आणि कासार्डे बौद्धवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच खाऊ वाटप करीत आईचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला.या सामाजिक विविध उपक्रामानंतर संध्याकाळी कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला गेला.
आईच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करणे हा निश्चितच कौतुकास्पद उपक्रम राबवला जात असून गेली कित्येक वर्षांपासून हा उपक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केला जात असल्याची माहिती अनिल चव्हाण या युवकाने दिली.
फोटो –
कासार्डे येथे आईच्या वाढदिवसानिमित्त ‘रक्तदान शिबीरात’ रक्तदान करतांना दाते व इतर मान्यवर