संवाद परिवाराच्या वतीने मधु कट्टयावरती रंगणार काव्य मैफिल
तळेरे,दि.२८ फेब्रूवारी
सुप्रसिद्ध लेखक, कवी डॉ.अनिल अवचट यांच्या कवितांचे व संत कबीरांचे दोहे यांच्या गायनाचा कार्यक्रम “अनवट अनिल…एक कबीर” हा वेगळा संगीत मैफिलीचा कार्यक्रम संवाद परिवार, तळेरे यांच्या वतीने शनिवार दि.१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ठीक ७.०० वाजता मधु कट्टा – तळेरे येथे आयोजित करण्यात आला आहे.
या संगीत मैफिल कार्यक्रमाच्या सादरकर्त्या गायिका सौ.कविता खरवंडीकर, संगीत- धनंजय खरवंडीकर, संवादिनी- विश्वास प्रभुदेसाई आहेत.
तरी या संगीत मैफिलीच्या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संवाद परिवाराचे संस्थापक डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.