जिल्हा परिषद सिंधुदूर्ग आयोजित क्रिडा स्पधेत देवगड तालुक्याने दमदार कामगिरी

देवगड,दि.१२ फेब्रूवारी
जिल्हा परिषद सिंधुदूर्ग आयोजित क्रिडा स्पधेत देवगड तालुक्याने दमदार कामगिरी करत सर्वांची वाहव्वा मिळवली .
गटविकास अधिकारी देवगड श्रीम .वृक्षाली यादव व गटशिक्षणाधिकारी श्रीरंग काळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळला . देवगडच्या संघाने प्रत्येक खेळात भाग घेत स्पर्धा गाजवली यावेळी देवगड तालुका क्रिक्रेट पुरुष गटात उप विजेता ठरला तर कबड्डी , लंगडी , रस्सीखेच पुरुष गटात उपविजेता ठरला . तर महिला गटात क्रिकेट संघ उप विजेता ठरला .
वैयक्तिक स्पधेत दिव्यांग मधुन बुद्धीबळ स्पधेत कुंदा बोंडाळे प्रथम क्रमांक , कॅरम सिंगल द्वितीय क्रमांक कुंदा बोंडाळे , भाला फेक ,गोळा फेक व थाळी फेक प्रथम क्रमांक अश्विनी सावंत यांनी पटकावला . पुरुष गटात थाळी फेक प्रथम क्रमांक प्रमोद कामतेकर तर गोळा फेक तृतीय क्रमांक विनायक धुरी तर थाळी फेक द्वितीय क्रमांक विनायक धुरी यांनी पटकावला .
१०० मिटर धावणे पुरुष गटात प्रथम क्रमांक सुनिल कोदले यांनी पटकावला ८०० मिटर धावणे पुरुष गटात गुंडू निऊंगरे यांनी पटकावला .थाळी फेक पुरुष प्रथम क्रमांक आदित्य कदम यांनी पटकावला . भालाफेक पुरुष तृतीय क्रमांक शितल देवरकर याने पटकावला . २०० मीटर धावणे महिला प्रथम क्रमांक आर्या धुरी हिने पटकावला ४०० मीटर धावणे महिला गटात तृतीय क्रमांक सीमा आंधळे यांनी पटकावला . उंच उडी महिला तृतीय क्रमांक शितल दुदवडकर हिने पटकावला . थाळी फेक महिला प्रथम क्रमांक कोमल राऊत हिने पटकावला , गोळा फेक महिला तृतीय क्रमांक कृपाली घाडी हिने पटकावला . तर भाला फेक महिला द्वितीय क्रमांक शितल मयेकर हिने पटकावला .
या जिल्हा परीषद क्रिडा स्पधेत प्रत्येक संघातील संघनायकांनी महत्वाची भुमिका बजावली . यामध्ये पुरूष गटात क्रिकेट संघनायक सुनिल कोदले , खो खो लहु दहीफळे , कबड्डी आनंद जाधव , रस्सीखेच आदीत्य कदम , लंगडी मधुसूदन घोडे यांनी काम पाहिल . तर महिला गटात महिला क्रिकेट संघनायक कोमल राऊत , रस्सीखेच संगिता भुजबळ , कबड्डी स्वप्नजा बिर्जे , खोखो मेधा राणे , लंगडी शितल मयेकर यांनी काम पाहिल .
या स्पधेत प्रमुख मार्गदर्शक म्हणुन गटविकास अधिकारी श्रीम .वृक्षाली यादव , सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जगताप , कक्ष अधिकारी संतोष बिर्जे , अधिक्षक कुणाल मांजरेकर , अधिक्षक मेधा राणे , विस्तार अधिकारी ग्रा.प अंकुश जंगले , आनंद जाधव , सचिन जाधव , मधुसुदन घोडे , संतोष राणे , प्रकाश वाडकर ,नविन जाधव यांनी काम पाहिल .
विजेत्या स्पर्धकाना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरवण्यात आल .