कट्टा येथे भंडारी समाज आयोजित सर्वजातीय वधुवर मेळावा संपन्न
मालवण, दि.१ मार्च
आजच्या संगणक युगात स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. प्रत्येक जबाबदारी ती समर्थपणे पेलते. पण आज या सर्व गोष्टींमुळे प्रत्येक मुलीच्या लग्नाच्या बाबतीत अटीशर्ती खूपच वाढल्या आहेत. त्यामुळे वधू वरांच्या पालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. व त्यांचे टेन्शन वाढले आहे. पण हीच समस्या दूर करण्यासाठी वधु वरांना एकाच छताखाली आणण्याचे व त्याची मने जुळविण्याचे मौलिक कार्य कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टा यांनी केले आहे. कारण समाजात असलेल्या कठीण गोष्टींची लीलया पेलणे हे फक्त भंडारी समाजच करू शकतो. असे प्रतिपादन ॲड. प्रदीप मिठबावकर यांनी केले.
कट्टा पंचक्रोशी भंडारी समाजाच्यावतीने आयोजित केलेल्या वधुवर परिचय मेळाव्याचे उद्घाटन ॲड. प्रदीप मिठबावकर यांचे हस्ते झाले यावेळी व्यासपीठावर मामा माडये, प्रदीप आवळेगावकर, आनंद वराडकर, गणेश वाईरकर, बाबुराव मसुरकर, पंढरीनाथ मसुरकर, मामा बांदिवडेकर, बबन मिठबावकर, गीतांजली हिंदळेकर, भाऊ नार्वेकर, प्रवीण मिठबावकर, शरद केळुसकर, किशोर वाक्कर, संदेश नाईक अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मामा माडये व परिवार यांचे समाजासाठी नेहमी असणारे योगदान व ओम गणेश साई मंगल कार्यालयच्या रौप्य महोत्सवी वर्ष याबद्दल त्याचा व कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन भंडारी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला
यावेळी आनंद टेमकर, सुरेश कांबळी, निलेश हडकर, मंगेश माडये, अजय मयेकर, गौरव नाईक, सुनील पोखरणकर, जीजी वाईरकर, प्रकाश सरमळकर, सुरेंद्र जबडे, योगेश पाटकर, संतोष नागवेकर, विद्याधर चिंदरकर, अनिल पाटील, सुनील शिरोडकर, संदीप सरमळकर, निरज माडये, सिद्धेश वराडकर, विशाल वाईरकर, प्राप्ती मिठबावकर, त्रिशा हडकर, वर्षा मिठबावकर, मधुरा माडये, गीता नाईक, मेघा पोखरणकर, कीर्ती मयेकर, प्रांजल नांदोसकर, प्रियांका जबडे, दर्शना नाईक, उपस्थित होते.
या वधुवर परिचय मेळाव्यात ८६ वधू व २७० वरानी आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव नाईक, प्रास्ताविक अनिल पाटील तर आभार कीर्ती मयेकर यांनी मानले.