बाळू कांडरकर मित्र परिवार आयोजित स्वर्गीय प्रकाशदादा परब स्मुर्ती चषक जिल्हास्तरीय कबड्डीस्पर्धेत 16 संघांनी घेतला सहभाग

यंगस्टार कणकवलीने विजेते पद पटकावले तर उपविजेता पंचक्रोशी फोंडाघाट कबड्डी सघाने पटकावले

सावंतवाडी,दि.१२ फेब्रूवारी

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे या ठिकाणी बाळू कांडरकर मित्र परिवार आयोजित व स्वर्गीय प्रकाशदादा परब स्मुर्ती चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन तळवडे या ठीकाणी करण्यात आले होते.

या स्पर्धेचे उद्घाटन सामजिक कार्यकर्ते देवा काबळी, उद्धव बाळा साहेब शिवसेना पक्ष सावंतवाडी तालुका प्रमुख रूपेश राऊळ, नीळकंठ दळवी, संजु पई., बंड्या परब, राजाराम धुरी, रवी सावंत, प्रसाद आरावदेकर, तळवडे सोसायटी अध्यक्ष आपा परब, यशवंत गोडकर, बाळु कांडरकर, विलास परब, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, सुहास सावंत, प्रदीप परब, विलास नाईक, विलास परब,सुरज परब, रविंद्र काजरेकर, बाळा परब, राजंन कास्टे, भक्ती भिसे, तसेच बाळु कांडरकर मित्रमंडळ चे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

या कबड्डी स्पर्धेत 16, संघ सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सहभागी झाले होते.या स्पर्धेत जिल्ह्यातील लक्ष्मीनारायण वालावल,यंगस्टार कणकवली अ व ब,पंचक्रोशी फोंडाघाट,शिवभवानी सावंतवाडी,जय महाराष्ट सावंतवाडी,रेवतळे मालवण,आझाद फोंडाघाट,कलेश्वर् नेरूर,विजय प्रतिष्ठान सावंतवाडी, एमएस आरटीएस सावंतवाडी,वाडोस,वाफोली,कोणशी,दोडामार्ग यातून १६ संघानी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक यंगस्टार कणकवली,द्वितिय क्रमांक पंचक्रोशी फोंडाघाट,तृतीय क्रमांक लक्ष्मीनारायण वालावलव व चतुर्थ क्रमांक यंगस्टार कणकवली ब हे संघ विजयी झाले तर या संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू सुमित गावडे (कणकवली), उत्कृष्ट चढाई स्वप्नील कोकरे(फोंडाघाट), उत्कृष्ट पकड अनिकेत पारकर(फोंडाघाट), यांना गौरविण्यात आले या स्पर्धेत पंच म्हणून विश्राम नाईक,मोहसीम शेख,मयूर सुभेदार,वसीम शेख,कृष्णा सावंत,दीपक चव्हाण,प्रसाद दळवी,संतोष कोरगावकर,विकी कदम,विश्राम दळवी यांनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी उपस्थित राहुन सहकार्य करणाऱ्या सर्व संघांचे व मान्यवरांचे बाळू कांडरकर मित्र परिवार यांच्यातर्फे अभिनंदन व आभार प्रा नारायण परब यांनी यावेळी मानले.