मुंबई,दि.१२ फेब्रूवारी
राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाच्या मागण्यांबाबत आज राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ पदाधिकार्यां समवेत झालेल्या बैठकीत अनेक मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहे त्यामूळे शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे
यामध्ये न्यायालयीन निकालानुसार लवकरच शिक्षकेतर पदांची भरती सुरु करण्यासाठी त्वरीत संच मान्यता करण्याबाबतचे निर्देश शिक्षण संचालक यांना दिले, तर शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी २४ वर्षाची दुसरी कालबध्द पदोन्नती लागू करणेसाठीचा प्रस्ताव तात्काळ कॅबीनेटमध्ये ठेवण्याबाबतचे निर्देश प्रधान सचिव यांना देण्यात आले,
तसेच ग्रंथपालांसाठी कालबध्द पदोन्नती देण्यात बाबतचा विषय वित्त विभागाकडे पाठविण्याचे आदेश शिक्षण सचिव यांना दिले,
आहे शिक्षकेतर कर्मचारी यांनी शैक्षणिक पात्रता वाढविल्यास त्यांना शिक्षकपदी पदोन्नती बाबत चर्चा करण्यात आली.
मंत्री महोदयां समवेत सकारात्मक चर्चा झाल्याने शिक्षकेतर महामंडळाने अंदोलनाबाबत दिलेला दि. २० फेब्रुवारीपासूनचा दुसरा टप्पा स्थगित करण्यात येत असून दिलेल्या अश्वासनानुसार निर्णय न झाल्यास महामंडळाचे पदाधिकारी उपोषणास बसणार असल्याचे जाहिर केले.
सहविचार सभेस मा.शिक्षणमंत्री महोदयांसमवेत शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, उपसचिव तुषार महाजन, शिक्षण संचालक संपत सुर्यवंशी, एस.एस.सी.बोर्ड अध्यक्ष शरद गोसावी, शिक्षकेतर महामंडळाचे राज्य अध्यक्ष अनिल माने, सरकार्यवाह शिवाजी खांडेकर, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, उपाध्यक्षा प्रिया पवार, मुंबई विभागीय कार्यवाह देविदास पंडागळे, पुणे विभागीय कार्यवाह गोवर्धन पांडुळे, कोल्हापूर विभागीय कार्यवाह गजानन नानचे, अंतर्गत हिशोबनीस रामचंद्र केळकर, पुणे जिल्हाध्यक्ष विनोद गोरे, अहमदनगर सचिव भानुदास दळवी, सातारा सचिव इमरान मुल्ला, चंद्रपुर सचिव प्रशांत हजारे, मुंबई सचिव सुनिल खाडे, सिंधुदुर्ग उपाध्यक्ष सुहास देसाई यादी उपस्थित होते.