कणकवली दि.३ मार्च
कणकवली शहरातील सर्व्हिस रोडलगत असलेल्या जय भवानी हे मोबाईल दुकान चोरट्यांनी फोडले. यात आतील टेबलच्या ड्राव्हरमध्ये असलेले 45 हजार रुपये लंपास केले होते. याप्रकरणी विक्रमसिंह हरितारा पुरोहित (28, सध्या, रा. तेलीआळी, मूळ. राजस्थान) याला पोलिसांनी ताब्यात घेत चोरीस गेलेले 45 हजार रुपये हस्तगत केले. कर्जबाजारी असल्याने हे कृत्य केल्याची कबुली संशियत विक्रमसिंह यांनी दिली.
मोबाईल दुकान चोरट्यांनी फोडल्याची घटना 25 फेब्रुवारी रात्री सव्वा नऊ ते 26 फेब्रुवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या कालावधीत घडली होती. या प्रकरणी दुकान मालक शांतीलाल पदमानी यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. पोलिसांनी तपास करून सीसीटीव्हीच्या आधारे संशयित विक्रमसिंह याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ व विनोद सुपल यांनी केली. विक्रमसिंह याच्याकडून पोलिसांनी चोरीस गेलेली 45 हजार रुपयांची रोकड हस्तगत केली.