सह्याद्री कृषी पर्यटन सहकारी सेवा संस्थेचा शुभारंभ १४ फेब्रुवारी रोजी मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते

सावंतवाडी दि.१२ फेब्रुवारी 
सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले व कुडाळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटक यावेत आणि पर्यटन विकास व्हावा म्हणून सह्याद्री कृषी पर्यटन सहकारी सेवा संस्था निर्माण केली आहे. दरम्यान या संस्थेचा शुभारंभ बुधवार दि.१४ फेब्रुवारी रोजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रामानंद शिरोडकर यांनी दिली.
कृषी पर्यटन सहकारी संस्थेचा शुभारंभ मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उपनिबंधक मणिक सांगळे, निबंधक सहकारी अधिक्षक सौ यु यु यादव, सहाय्यक निबंधक सुनील मरभल, जितेंद्र पंडित,माडखोल सरपंच सौ श्रृष्णवी राऊळ,कारिवडे सरपंच सौ आरती माळकर, कुणकेरी सरपंच सौ सोनिया सावंत आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी कृषी पर्यटन सहकारी सेवा संस्था अध्यक्ष रामानंद शिरोडकर यांनी माहिती दिली. यावेळी या संस्थेचे संचालक प्रमोद सावंत,सौ विभावरी सुकी, आनंद मेस्त्री,भरत गावडे,जोश कन्नाई, नंदकिशोर दळवी, सुभाष भितये, ज्ञानेश्वर सावंत,मानद सचिव धर्माजी गावडे आदी उपस्थित होते.
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आपल्या सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले व कुडाळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल त्यासाठी पर्यटन स्थळाची माहिती देऊन पर्यटकांची संख्या वाढत जाईल असे प्रयत्न केले जातील. कृषी, आध्यात्मिक, फळझाड लागवड, ऐतिहासिक वारसा लाभलेले किल्ला, सावंतवाडी संस्थान अशा विविध स्थळांवर भेटी दिल्या जातील. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी संस्था विविध कार्यक्रम आयोजित करेल असे रामानंद शिरोडकर, प्रमोद गावडे, सौ विभावरी सुकी, आनंद मेस्त्री यांनी सांगितले.
या संस्थेच्या शुभारंभ कार्यक्रम बुधवार दि.१४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता सावंत फार्म हाऊस माडखोल धरण या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. यावेळी सर्व पर्यटन प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.