महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी घेतली अर्थ राज्य मंत्र्यांची भेट
नवी दिल्ली,दि.१२ फेब्रुवारी
केंद्र सरकारच्या आर्थिक बिल 2023 मध्ये नव्याने केलेल्या सेक्शन 43 मधील तरतुदीनुसार सूक्ष्म व लघु उद्योगांना 45 दिवसात उधारी न भगविल्यास त्या रकमेवर आयकर भरावा लागण्याच्या तरतुदीला एक वर्ष मुदतवाढ देण्याच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली. खासदार धैर्यशील माने व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी व खासदार धैर्यशील माने यांनी आज नवी दिल्ली येथे या विषयावर मुदत वाढीच्या मागणीसाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व व्यापार,उद्योग जगताच्या वतीने एक निवेदन श्री पंकज चौधरी यांना सादर केले त्याप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी व खासदार धैर्यशील माने यांनी वस्त्रोद्योगांमध्ये तीन ते चार महिने उधारीची परंपरा कित्येक वर्षापासून चालू असून अचानकपणे हा नवीन नियम आणल्याने वस्त्रोद्योगांसमोर वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहेत या तरतुदीतील संभ्रम दूर करेपर्यंत व या संदर्भात पुरेसे प्रबोधन होण्यासाठी या वर्षीपासून ही तरतूद लागू न करता याला एक वर्षाची मुदतवाढ द्यावी अशी आग्रही मागणी यावेळी केली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी याविषयीचे सविस्तर निवेदन अर्थ राज्य मंत्र्यांना देऊन व्यापार, उद्योग जगतासमोर या निर्णयामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर विस्ताराने चर्चा केली.
विशेषता या तरतुदीमुळे छोट्या उद्योगांच्या रद्द होत असलेल्या ऑर्डर्स, व्यापारी वर्गाला उधारी देण्याचे बंधन मात्र स्वतःची उधारी वसूल होण्यासाठी कोणतेही संरक्षण नाही, त्यामुळे भांडवल व्यवस्थापनामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता , यासह विविध तांत्रिक विषयावर येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा केली व या तरतुदीला एक वर्ष मुदतवाढ द्यावी अशी आग्रही मागणी ललित गांधी यांनी मागणी केली.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी या अडचणी योग्य व वास्तविक व्यापार उद्योग करताना येणाऱ्या अडचणी असल्याने आपण याविषयी सकारात्मक प्रयत्न करून योग्य तो न्याय देऊ अशी ग्वाही दिली. याप्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या युवा उद्योजक समितीचे प्रमुख संदीप भंडारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.