पंचायत समितीचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत बाहेर फिरत असल्याच्या विरोधात आंदोलन

मालवण,दि.१२ फेब्रुवारी

मालवण पंचायत समिती मधील कर्मचारी कार्यालयीन वेळेत पंचायत समिती आवाराच्या बाहेत फिरत असतात. कर्मचारी अधिकाऱ्यांचे ऐकत नाहीत असा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते महेश जुवाटकर यांनी आज मालवण पंचायत समिती येथे भर उन्हात उपोषण आंदोलन सुरु केले. अखेर गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांनी कार्यालयीन वेळेत कर्मचाऱ्यांनी कुठेही जाऊ नये याबाबत सक्त सूचना देण्यात येतील असे सांगितल्यानंतर जुवाटकर यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

मालवण पंचायत समिती मधील कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत आवाराच्या बाहेर स्वतःची कामे करत असतात. गटविकास अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. कर्मचारी अधिकाऱ्यांचे ऐकत नाहीत. आजही काही कर्मचारी पंचायत समिती आवाराच्या बाहेर फिरत आहेत. कार्यालयीन कामे सोडून वैयक्तिक कामे करत आहेत असा आरोप करत जुवाटकर यांनी गटविकास अधिकारी दालनासमोर भर उन्हात आपले उपोषण सुरु केले. अखेर गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांनी कार्यालयीन वेळेत कर्मचाऱ्यांनी कार्यालय सोडू नये अशा सक्त सूचना देण्यात येतील असे सांगितले. त्यानंतर जुवाटकर यांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र, यापूढेही बदल न दिसल्यास यापेक्षा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जुवाटकर यांनी दिला.