मृणाल पिरावाडी प्राथमिक शाळेचा इयत्ता सातवीचा विद्यार्थी
आचरा,दि.१२ फेब्रूवारी (अर्जुन बापर्डेकर)
समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियान सन 2023 24 उपक्रमा अंतर्गत एक्सपोजर व्हिजिट आऊटसाईड स्टेट या सहलीसाठी आचरा पिरावाडी शाळेचा इयत्ता सातवीचा विद्यार्थी कु मृणाल धुरी आणि मसुरे येथील शाळेच्या कुमारी यशस्वी गुरुनाथ ताम्हणकर या दोन विद्यार्थ्याची मालवण तालुक्यामधून निवड झाली आहे. 20 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान बेंगलोरला विशेष सहल संपन्न होत आहे. या सहलीसाठी ज्या शाळा सर्वात जास्त प्रगत झालेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांचे अध्ययन निष्पत्ती सर्वोत्तम आहे त्यांना प्रोत्साहन व बक्षीस देण्यासाठी त्यांना इतर राज्यात अभ्यास दौऱ्यासाठी प्रस्तावित केलेले आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण 20 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली यात आचरा पिरावाडी प्राथमिक शाळेचा विद्यार्थी कुमार मृणाल विठ्ठल धुरी याची निवड करण्यात आली .आचरा पोलीस पाटील विठ्ठल धुरी यांचा मृणाल हा मुलगा होय त्याच्या निवडीबद्दल मुख्याध्यापक सुभाष नाटेकर, सर्व शिक्षक,पालक तसेच आचरा परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.