सावंतवाडी खासकीलवाडा येथे जाळ्यात पाच फूट लांब धामण जातीच्या सापाची सुखरूप सुटका

सावंतवाडी दि.१३ फेब्रुवारी 
सावंतवाडी खासकीलवाडा येथे गोवेकर यांच्या विहीर वर जाळ्यात पाच फूट लांब धामण जातीचा सरपटणारा साप अडकला होता. त्याची सुटका करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी श्री. नवीद हेरेकर व त्यांचा इयत्ता दुसरीत शिकणारा मुलगा कु कबीर हेरेकर यांनी यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांना बोलावण्यात आले त्यानंतर त्यांनी धामण जातीचा सरपटणारा साप अडकला त्याची सुखरूप सुटका करून नैसर्गिक अधिवासात सोडले.