मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या विद्यार्थी मेळाव्यात विद्यार्थ्यांचा पक्षप्रवेश

सावंतवाडी,दि.१३ फेब्रुवारी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सावंतवाडी यांच्या माध्यमातून येथे संपन्न झालेल्या भव्य विद्यार्थी मेळाव्यात अनेक नवोदित विद्यार्थ्यांनी पक्षप्रवेश केला.यावेळी मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री.संदीप दळवी व मनसे कामगार सेना राज्य सरचिटणीस श्री. गजानन राणे, जिल्हाध्यक्ष अँड अनिल केसरकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी विद्यार्थी प्रवेशासाठी विशेष परिश्रम घेतले.

तसेच मान्यवरांकडून विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष श्री.केतन सावंत आणि सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी सेनेचे माजी युनिट अध्यक्ष कु.साहील तळकटकर व दिपाली राऊळ यांनी सूत्रसंचालन केले.तर या मेळाव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी चे सर्व पदाधिकारी तसेच विद्यार्थी सेनेचे सचिन पाटणकर,प्रतीक मालवणकर,अमोल नाईक,रसिका पालव,प्रणाली परब,संध्या पाताडे,सोनाली सावंत,शमिका सावंत,सेजल कुंभार,ओमकार नवार,भगवान राऊळ,गौरव राऊळ,यश नाईक व इतर उपस्थित होते.