मालवण,दि.६ मार्च
मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या सन १९७६ – ७७ च्या दहावी बॅचचा सलग चौथा स्नेहमेळावा तोंडवळी येथे संपन्न झाले. यावेळी माजी विद्यार्थ्यानी विविध कार्यक्रमाद्वारे मजा मस्ती करत आनंद लुटतानाच शालेय जीवनातील गोड आठवणीमध्ये रमून गेले.
या स्नेहमेळाव्यात तोंडवळीच्या समुद्र किनाऱ्यावर माजी विद्यार्थ्यांनी मजा मस्ती केली. तर संगीत रजनी कार्यक्रमात माजी विद्यार्थी रमून गेले. यावेळी चित्रा लोणे यांच्या अथर्वशीर्षाने संगीत रजनीला प्रारंभ झाला. तसेच कौतुकाची थाप हा कार्यक्रमही संपन्न झाला. तर दुसऱ्या दिवशी देखील किनाऱ्यावर धमाल करतानाच सर्वांनी होडीतून समुद्रात दीड तास फेरफटका मारला. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी एकत्र जमत गप्पा टप्पा कार्यक्रमात आपल्या जुन्या आठवणीना उजाळा दिला. तसेच प्रश्नमंजुषा, शब्दकोडे, हाऊसी असे खेळही खेळले.
या स्नेहमेळाव्यास या बॅचचे माजी विद्यार्थी व माजी आमदार किरण पावसकर यांनीही उपास्थिती दर्शवून आपल्या वर्गमित्रांना विविध शासकीय योजना तसेच राजकारण याविषयी माहिती दिली. तसेच या बॅच गुप तर्फे गेल्या चार वर्षात करण्यात आलेल्या सामाजिक कार्याची माहिती श्री. पावसकर यांनी देताना गुरुवंदना कार्यक्रम, स्वप्ननगरी आश्रम माणगाव येथे वाणसामान व बेडशीट वाटप, सावंतवाडी येथे कॅन्सर मिशनरीसाठी आर्थिक मदत, कामगारांना तांदूळ वाटप, अपंग संस्थेचे अध्यक्ष विनोद धुरी यांना सायकल खरेदीसाठी आर्थिक मदत तसेच बॅच मधील एका मित्राला ऑपरेशन साठी आर्थिक मदत करण्यात आल्याचे सांगितले. वर्गमित्रांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणारे प्रमोद मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वांनी कौतुक केले.
या स्नेहमेळाव्यात प्रमोद मोहिते, चंद्रशेखर वाईरकर, रेखा मसूरकर मंगल सारंग, कांचन सोहनी, शितल गुजर, सुषमा सामंत, दिगंबर परुळेकर, यज्ञेश्वर गावकर, श्रद्धा गावकर, चित्रा लोणे, महेश काळसेकर, लॉरेन्स सुभाष आचरेकर, पांडू राणे, प्रदिप आजगावकर, गोविंद पारकर, नारायण वझे, विलास पारकर, दिनेश नाईक, अरविंद सराफ, रविंद्र परब, जमशीद खान, चंद्रकांत खोत, निळू मालणकर, गणपत सावंत, सुनील गिजरे, जयवंत देसाई, चंद्रशेखर आचरेकर, सुभाष पाटकर, मंगल खानोलकर, मीना मयेकर, चंद्रशेखर केळूसकर, फरजाना खान, हिरा माणगावकर, संध्या मेस्त्री, अनमेरी पिंटो, हेमा नलावडे, विजय नेसरकर, किरण पावसकर, सौ. केळूसकर, सौ. परब, विलास पेडणेकर, सुनिता माणगांवकर, तुळशी माणगावकर, नागेश परब, विष्णू नाबर, काशीनाथ राणे, विनायक झांटये, किशोर जामसंडेकर, सौ. विलींदी नेरूरकर, स्वाती पेडणेकर, सुरेल परब आदी माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.