ठाकरे,पवार,काँग्रेस यांची वाताहात लावून आघाडीला हार घालण्याची आणली वेळ
कणकवली,दि.१३ एप्रिल ( भगवान लोके)
चपट्या पायाचा संजय राऊत जिकडे पाय ठेवतो तो पक्ष संपलेला आहे. उद्धव ठाकरे, पवार साहेब यांना अडचणीत आणून संपवल्या नंतर आता काँग्रेस ला देखील संपवणार हे मी अगोदर बोललो आहे. त्यामुळे ह्याला कोणी घरात किंवा ऑफिस मध्ये सुध्दा घेऊ नये.आता संजय राऊत च टार्गेट प्रकाश आंबेडकर आहेत. वंचित बहुजन आघाडी पक्ष फोडायचा आहे. श्री.आंबेडकर यांनी वेळीत राऊत या माणसाला ओळखावं आणि सावध व्हावे असे आवाहन भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी केले.कणकवलीत प्रहार भवन येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
आज सकाळी छत्रपती संभाजी नगर वरून पादऱ्या पावट्या टर टर करत होता.चपट्या पायाचा संजय राऊत जिकडे पाय ठेवतो तो पक्ष संपलेला आहे. उद्धव ठाकरे, पवार साहेब यांना संपवल्यानंतर आता काँग्रेस ला देखील संवणार हे मी अगोदर बोललो होतो. त्यामुळे ह्याला कोणी घरात किंवा ऑफिस मध्ये सुध्दा घेऊ नये. 2019 पासून जनमताच्या विरोधात जाऊन राजकारण कोणी “नासवल” हे राऊत ने आरशात पाहिलं असत तर त्याला समजलं असत. नावाने याचे दुसरे नावच संजय राऊत आहे.आता फक्त महाविकास आघाडीच्या फलकाला जाऊन हार घालावा तेव्हढेच शिल्लक राहिले आहे.
आता वंचित आघाडी कडे संजय राजाराम राऊत ने आपला लक्ष वळविला आहे. जे उद्धव ठाकरे, पवार आणि काँग्रेस यांना अडचणीत आणून काहीना संपवले.आता टार्गेट प्रकाश आंबेडकर आहेत. हे प्रकाश आंबेडकर यांनी वेळीत ओळखावं आणि आपला पक्ष वाचवावा.
ज्यांनी 2019 पासून 10 जनपथ वर नवीन मम्मी आहे. अस ज्यांनी सिद्ध केलं आहे त्यांनी काँग्रेस बद्धल बोलू नये. उध्दव ठाकरे यांच्या सरकार मध्ये तेव्हा अजित दादा, अशोक चव्हाण हे होते तेव्हा तुम्हाला चांगले होते. आता आमच्या सोबत आल्यावर ते वाईट का कसे ? उद्धव ठाकरे संवल्यानंतर आता ह्याचा लक्ष जो बायडन आहे असं वाटत.असा टोला सुद्धा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना लगावला.
बॉक्स
*काँग्रेसच्या आमदारांना पक्षात काहीच किंमत नसते,चव्हाण यांचा निर्णय योग्य*
राणे साहेबांनी काँग्रेस सोडताना भावना व्यक्त केल्या होत्या.त्या खऱ्या आहेत. काँग्रेस पक्ष ते स्वतःच्या आमदाराला किती महत्व देतात हे मी बघितला आहे. कोकणातून मी एकटा काँग्रेसचा आमदार होतो मात्र राहुल गांधी, किंवा प्रदेशाध्यक्ष आम्हाला केव्हा ही भेटले नाहीत. किंवा साधी चौकशी केली नाही. त्यावेळी राणे साहेबांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य होता.आणि आजचा अशोक चव्हाण यांचा सुद्धा निर्णय योग्यच आहे असे ते म्हणाले.