सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये वेशभूषा स्पर्धा आणि वार्षिक बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

सावंतवाडी दि.१३ फेब्रुवारी
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्था संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये शनिवार दि . १० फेब्रुवारी रोजी केजी विभाग व इ. १ ली ते ४ थी वर्गाची वेशभूषा स्पर्धा तसेच प्रशालेचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावर्षीची वेशभूषा स्पर्धा
विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार ऐच्छीक विषयावर आधारीत घेण्यात आली होती . यामध्ये केजी विभाग व इ .१ली ते ४ थी तील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय नेते , समाजसुधारक , छत्रपती शिवाजी महाराज , शिक्षक ,डॉक्टर , सैनिक , शेतकरी , कारटून पात्रे , रक्तदानाचे महत्त्व , स्त्री शक्ती , सोशल मिडियाचा अतिवापर ,
चंद्रयान , परी , जीवनावश्यक वस्तू , पदार्थ , विविध राज्यांच्या वेशभूषा , अंतराळवीर , ‘जय जवान जय किसान ‘ पुस्तकांचे महत्व अशा वेगवेगळ्या अनोख्या वेशभूषांच्या आधारे उपस्थितांची मने जिंकली.
वेशभूषा स्पर्धेत केजी विभागातील नर्सरी वर्गातील कु . अमायरा बंगलेकर -प्रथम ,कु . जोया खान – द्वितीय कु. लबीबा कडोली -तृतीय , ज्यूनियर केजीतील कु. मिफ्रा शेख -प्रथम कु .विघ्नेश साटेलकर – द्वितीय , कु. अम्मार शेख -तृतीय , सिनीयर केजी मधील कु . इसरा बेग – प्रथम , कु . आयुष गावडे -द्वितीय, कु . हेमराज साटेलकर याने तृतीय क्रमांक मिळवला .
तसेच इ. १ ली तील कु . अझा शेख -प्रथम , कु. अनस बक्कर -द्वितीय , कु. झारा बेग – तृतीय ,
इ. २ रीली तील कु . अल्फिया नेसर्गी – प्रथम , कु. भूमी गवस – द्वितीय , कु. मोहिनी शिरसाट – तृतीय , इ. ३ रीतील कु . नहुष पारगावकर – प्रथम ,कु . अनस शेंडेवाले व कु .नोमान अन्सारी- द्वितीय , कु . जुहा शेख – तृतीय ,इ . ४ थी तील कु .मोहम्मद अश्मान मकानदार -प्रथम , कु. आयेशा बंगलेकर व कु . सबरीना शेख -द्वितीय
कु. मायरा पटेल हिने तृतीय क्रमांक पटकावला . वेशभूषा स्पर्धेचे परिक्षक म्हणून पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्राध्यापिका श्रीम. पुनम सावंत आणि श्रीम. हर्षदा परब यांनी काम पाहिले . तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली.
त्यानंतर प्रशालेचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. यावर्षी प्रशालेने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत उपस्थित पालकांच्या हस्ते विविध आंतरशालेय स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला .
या कार्यक्रमाला सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी ,पालक – शिक्षक संघ कार्यकारणी समितीचे सर्व पदाधिकारी ,प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम.निर्मला हेशागोळ ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते .सर्वांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला व विद्यार्थ्यांचे कौतुक केले .