प्रसिध्द साहित्यिक (कै.) प्र. श्री. नेरूरकर यांचा ‘जन्मदिन’ कार्यक्रम १४ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार

बांदा ,दि.१३ फेब्रुवारी
प्रसिध्द साहित्यिक (कै.) प्र. श्री. नेरूरकर यांचा ‘जन्मदिन’ कार्यक्रम बांदा येथील नट वाचनालयात बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात प्रतिथयश साहित्यिकाला “प्र.श्री. नेरूरकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी केरी गोवा येथील साहित्यिक, लेखक भावार्थ मांद्रेकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास सर्व साहित्यप्रेमी व नेरुरकर सरांच्या विद्यार्थी वर्गाने व मित्रपरिवाराने अगत्य उपस्थित रहावे, असे आवाहन वाचनालयाच्या संचालक मंडळाने केले आहे.