मुंबई दि.१३ फेब्रुवारी
कोनाळ ( ता . दोडामार्ग) ग्रामविकास मंडळ, मुंबई आयोजित स्नेहसंमेलन बदलापूर येथे जल्लोषात साजरे करण्यात आले. यावेळी मुंबईच्या परिसरात राहणाऱ्या कोनाळ गावातील कुटुंबातील बरेच सदस्य एकत्रित आले होते. खेळ, हळदीकुंकू अशा विविध कार्यक्रमांनी स्नेहसंमेलनात धमाल उडवून दिली.
कोनाळ ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री.नारायण रावजी सावंत, सचिव श्री.जयसिंग हरिश्चंद्र लोंढे,कोषाध्यक्ष श्री.महेश राघोबा लोंढे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
दरवर्षीप्रमाणे स्नेहसंमेलन कार्यक्रम रविवारी मातोश्री रिसॉर्ट बदलापूर येथे संपन्न झाले, बहुसंख्येने सभासद, माहेरवाशिणी आणि मुंबई रहिवाशी परिवार यावेळी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमात लहान गट खेळ, मोठा गट खेळ आणि महिलांसाठी पैठणी खेळ असे आयोजन केले होते, या खेळात विजयी ठरलेले स्पर्धक लहान गट कु. आर्यन राजन लोंढे,
मोठा गट श्री.प्रशांत जयराम सावंत आणि विशेष आकर्षण पैठणी विजेती आमची माहेरवाशिण सौ.स्नेहल (शामल) सुरेश देसाई.
स्नेहसंमेलन कार्यक्रमास आलेल्या माहेरवाशिणी, पाहुणेमंडळी यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच कोनाळ ग्रामविकास मंडळाचे माजी अध्यक्ष श्री.राणबाराव जयराम लोंढे यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात हळदीकुंकू आमच्या माहेरवाशिणी सौ.रंजना, सौ.कल्पना आणि सौ.आरती यांनी स्वखुशीने केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गजानन महादेव लोंढे यांनी केले.