गॅस सिलिंडर ऑनलाईन बुकिंग मुळे ग्राहक हैराण

तात्काळ तोडगा काढण्याची मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांची मागणी

सावंतवाडी दि.१३ फेब्रुवारी
गॅस सिलिंडर ऑनलाईन बुकिंग करण्याचा फतवा काही दिवसांपूर्वी गॅस कंपन्यांमार्फत काढण्यात आला असून याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे.ऑनलाईन बुकिंग करताना अनेक ग्राहकांना नेमकं काय करावं याची साधी माहिती देखील देण्यात आलेली नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अँड अनिल केसरकर यांनी म्हटले आहे.

अँड अनिल केसरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,शहरात या गोष्टी करणे काहीसे सोपे असले तरी ग्रामीण भागातील ग्राहक ,ग्रुहीणी व जेष्ठ नागरिक या प्रकारामुळे हैराण झाल्याचे दिसून येत आहॆ .ग्रामीण भागात मोबाईल रेंज नसल्यामुळे ऑनलाईन सिलिंडर बुकिंग करणे शक्य नाही. त्यामुळे या ग्रामीण भागातील नागरिकांना फक्त सिलिंडर बुकिंग करण्यासाठी शहरात यावे लागणार असून त्याचा आर्थिक भुर्दंड नाहक लोंकाना सहन करावा लागत आहे.
या बाबत तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात या साठी मनसे तर्फे सावंतवाडी तहसीलदार यांची भेट घेण्यात येणार असून यातून योग्य मार्ग काढावा अशी विनंती करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.