सावंतवाडी येथील ५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाला शेकडो विद्यार्थ्यांनी दिली भेट

दर दिवशी अडीच हजार विद्यार्थी भेट देतील अशी तजवीज शिक्षण विभाग कडून करण्यात आली

सावंतवाडी दि.१३ फेब्रुवारी 
शिक्षण विभाग आणि यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिमखाना मैदानावर ५१ वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते .समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय घेऊन या ठिकाणी राज्यभरातील बालवैज्ञानिकानी आपले प्रकल्प सादर केले होते. या प्रदर्शनाला जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी भेट दिली दर दिवशी अडीच हजार विद्यार्थी भेट देतील अशी तजवीज शिक्षण विभाग कडून करण्यात आली होती.

या प्रदर्शनाचा समारोप आणि बक्षीस वितरण उद्या बुधवार दि.१४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज्य पाठ्यपुस्तक मंडळ के संचालक कृष्णकुमार पाटील, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, शिक्षण संचालक राहुल रेखावार, उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, सहसंचालक डॉ. शोभा खंदारे, शिक्षण संचालक महेश पालकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण प्राचार्य राजेंद्र कांबळे, विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे, राज्य विज्ञान संचालक डॉ. राधा अतकरी, प्रवीण राठोड, डॉ. राजकुमार अवसरे, शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, वामन तर्फे, भोसले नॉलेज सिटी चे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, राजू नेब आदी उपस्थित राहणार आहेत.
बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन १० फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभासी पद्धतीने केले होते यावेळी आभासी पद्धतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या तर शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थिती दर्शवून बालवैज्ञानिकांची पाठ थोपटली त्यानंतर दर दिवशी विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थिनी भेट दिली आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. राज्यभरातील विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन घडविले त्यांचे मूल्यमापन प्रक्रिया व प्रदर्शन सर्वांसाठी खुले झाले आणि आता या प्रदर्शनातील प्रकल्पांचे मूल्यमापन करून त्यांना राज्यस्तरीय विभागीय स्तरीय बक्षिसे दिली जाणार आहेत त्याचे बक्षीस वितरण उद्या बुधवार दि.१४ फेब्रुवारी रोजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
आजही विज्ञान प्रदर्शनाला भेटी देण्यासाठी विद्यार्थ्यांची जत्रा झाली होती तसेच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमही विद्यार्थ्यांनी सादर केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन भरून त्यांच्या स्वप्नांना चालना देण्यासाठी प्रयत्न झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली असून शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांना विद्यार्थ्यांनी धन्यवाद दिले आहेत अशी माहिती जिल्ह्यातील उपस्थित आयोजकांनी दिली.