सावंतवाडी दि.१३ फेब्रुवारी
सावंतवाडी तालुक्यातील शेकडो शिधापत्रिका धारकांना लाभार्थी असूनही रेशनिंग धान्य मिळत नसल्याने आमरण उपोषणास बसण्याचा इशारा माजी पंचायत समिती सदस्य सिताराम उर्फ बाळा शिरसाट यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
रेशनिंग धान्यापासून वंचित लाभार्थ्यांना धान्य मिळावे असे प्रयत्न करूनही तालुक्यातील शेकडो शिधा पत्रिका धारक रेशनिंग धान्यापासून वंचित आहेत. या लाभार्थ्यांना कित्येक वर्षे लोटली तरी शासनाकडून धान्य मिळत नाही. शिधापत्रिका फक्त नावापुरतीत आहे. शिधापत्रिका असूनही धान्य मिळत नसल्याने तहसीलदार यांना बाळा शिरसाट यांनी निवेदन देऊन याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा धान्य मिळत नसल्याच्या निषेधार्थ बुधवार दि. २८ फेब्रुवारी रोजी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा श्री शिरसाट यांनी दिला आहे.
या नियोजनाच्या प्रति पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, प्रांताधिकारी सावंतवाडी ,पोलीस निरीक्षक सावंतवाडी यांना त्यांनी पाठविलेल्या आहेत.