माघी गणेशोत्सवानिमित्त देवगड किल्ल्यातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची रीग

शिवसेना नेते अतुल राव राणे यांनी घेतले गणरायाचे दर्शन

देवगड,दि.१३ फेब्रुवारी
श्री गणपती मंदिर देवगड किल्ला या ठिकाणी मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त मंगळवारी सकाळी पासून गणेश भक्तांनी दर्शनाकरिता रांगा लावल्या होत्या.मंगळवार गणपतीचा वार असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात देवगड किल्ला गणपती मंदिरात दाखल झाले होते.विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वा. अभिषेक व पूजन होऊन देवदर्शन सुरुवात झाली श्री सत्यनारायणाची महापूजा महाआरती त्यानंतर सुश्राव्य स्थानिक भजने, तीर्थप्रसाद व महाप्रसाद पार पडला या माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून आम.नितेश राणे ,तसेच भैरी भवानी प्रतिष्ठान अध्यक्ष अतुल रावराणे यांनी भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले या निमित्ताने आम.नितेश राणे,अतुल रावराणे यांचा ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार घाटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.या वेळीं ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, रात्री ८ वा. माझी मायबोली, राधानगरी प्रस्तुत ,महाराष्ट्राची परंपरा जागृत ठेवणारा संगीत नृत्याविष्कार “गाथा महाराष्ट्राची” हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी शिवसेना नेते अतुल राव राणे यांनी गणरायाचे दर्शन घेतले त्यांच्या समावेत नगरसेवक विशाल मांजरेकर माजी नगरसेवक विकास कोयंडे आधी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी अतुल राव राणे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.