सावंतवाडी दि.१३ फेब्रुवारी
श्री गुरुदेव पाटेकर पंचायतनाच्या वतीने सालाबाद प्रमाणे गुरुवार दि.१५ फेब्रुवारी रोजी श्री देव पाटेकर महाराज वाढदिवस व श्री देव दत्ताजीराव प्रतिष्ठापना वाढदिवसानिमित्त साजरा करण्यात येणार आहे
या वाढदिवसानिमित्त वावळेश्वर दशावतारी नाट्य मंडळ तेंडोली यांचा रात्री आठ वाजता “अघोर लक्ष्मी” या नाटकाचा प्रयोग होणार आहे. तत्पूर्वी श्री देव भवानी शंकर महाराज यांचे मार्गदर्शन होणार आहे. यानिमित्ताने तीर्थप्रसाद ,मार्गदर्शन व नाटक याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रवीण भोसले, रवींद्र भोसले, सुभाष भोसले, धैर्यसिंग भोसले, राजेंद्र भोसले, जयाजी भोसले, अमरसिंग भोसले, अजयसिंह भोसले, विक्रमसिंग भोसले व समस्त भोसले परिवाराने केले आहे.
गुरुवार दि.१५ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आरती व महाप्रसाद दुपारी एक ते दोन, सायंकाळी चार पासून तीर्थप्रसाद, भजन कार्यक्रम दुपारी ३.३० वाजता श्री देव पाटेकर तरुण मंडळाचे भजन होईल. सायंकाळी सहा ते सात वाजता फटाक्यांची आतषबाजी होईल. सायंकाळी सात वाजता श्री देव भवानी शंकर महाराज यांचे मार्गदर्शन होईल. रात्री आठ वाजता वाळवेश्वर कंपनीचे दशावतारी नाटक होईल. श्री देव पाटेकर पंचायतन देवस्थान पटांगण तिरोडा खासेवाडी या ठिकाणी श्री देव पाटेकर तरुण मंडळ व ग्रामस्थ खासेवाडी तिरोडा यांच्या व्यवस्थापनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे सांगण्यात आले.