कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील वरची धाटवाडी शाळा दुरुस्तीस टाळाटाळ

 संतप्त पालक नगरसेवक यांची पं. स. कार्यालयात धडक सात दिवसात निर्णय घ्या अन्यथा मुले न पाठवण्याचा दिला इशारा

दोडामार्ग, दि. १३ फेब्रुवारी 

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आमदार शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या मतदार संघातील कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील वरची धाटवाडी जि. प. शाळा वर्ग खोली दुरुस्ती प्रस्ताव सादर करून पाच वर्षे झाली तरी जिल्हा परिषद शिक्षण विभाग पंचायत समिती कडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. विद्यार्थी यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो या पार्श्वभूमीवर येथील पालकांनी तसेच नगरपंचायत नगरसेविका सभापती यांनी मंगळवारी दोडामार्ग पंचायत समिती मध्ये धडक देऊन गट विकास अधिकारी अजिंक सावंत यांना निवेदन सादर केले. चर्चा केली. सात दिवसात दुरुस्ती झाली नाही तर आठव्या दिवशी एकही मुल शाळेत पाठवले जाणार नाही असा इशारा यावेळी दिला.