सासोली येथे पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत देवस्थान स्थानिक उपसमिती निवड कृष्णा गवस यांची एकमताने अध्यक्षपदी निवड

दोडामार्ग, दि.१३ फेब्रुवारी
सासोली गावचे युवा सरपंच संतोष शेटये यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा मंगळवारी घेण्यात आली. यावेळी गावातील ग्रामस्थ यांच्यात एकोपा कायम राहिला पाहिजे सर्व धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सुरळीत पार पडले यासाठी गावातील ग्रामस्थ यांनी ग्रामसभेत श्री माऊली सातेरी, भटवाडकर, देवस्थान स्थानिक उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेऊन समिती निवड करून अध्यक्ष म्हणून गावचे मानकरी तसेच माजी सरपंच कृष्णा गवस यांची निवड करण्यात आली. हात उंचावून ही निवड केली.