न.पं.प्रारूप विकास आराखडा रस्ते पाणी मुलभूत प्रश्न प्रथम सोडवा नंतरच आराखडा बनवा नागरिकांची मागणी

 देवगड जामसंडे शहराची सुधारीत विकास योजना तयार करण्याची प्रक्रिया सुरू

देवगड,दि.१३ फेब्रुवारी
प्रारूप विकास आराखडा तयार करताना नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यापुर्वी देवगड जामसंडे वासिंयांचा महत्वाचा असलेला पाणीप्रश्न सोडवा.रस्ते,पाणी यामुलभुत सुविधा असतील तरच पर्यटन वाढेल त्यामुळे सर्वप्रथम त्याला प्राधान्य द्या अशी मागणी देवगड जामसंडेमधील नागरिकांनी देवगड जामसंडे न.पं.चा प्रारूप विकास आराखडा सभेत केली.नागरिकांनी यावेळी उपस्थित अधीकारी व प्रशासनालाही चांगलेच धारेवर धरले.
देवगड जामसंडे शहराची सुधारीत विकास योजना तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून याच अनुषंगाने विकास योजनेमध्ये स्थानीक नागरिकांद्वारे सुचविण्यात आलेल्या आवश्यक सुविधा विचारात घेवून विकास योजना तयार करण्यासाठी देवगड जामसंडे न.पं.प्रारूप विकास आराखडा भागधारकांची सभा न.पं.मध्ये नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत, मुख्याधीकारी सुरज कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.या सभेला नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक विद्याधर देसाई, नगररचनाकार सुनील खांडेकर, सहाय्यक नगररचनाकार ओंकार बाबर, अॅपेक्स कंपनीचे प्रतीनिधी विपुल देवघरे हे उपस्थ{त होते.
किल्ला गणपती मंदीराकडून कस्टम हाऊसपर्यंत रस्ता तसेच कृष्णा पारकर ते दत्तमंदीर असा खाडीकीनारी रस्ता आवश्यक आहे अशी सुचना विजय कदम यांनी मांडली तर न.पं.च्या सतराही प्रभागातील ड्रेनेजची व्यवस्था करावी अशी सुचना पाणीपुरवठा सभापती संतोष तारी यांनी केली.जामसंडे बाजारपेठ ते तलावपर्यंत रस्त्याची सुचना नगरसेवक सुधीर तांबे यांनी केली.तर नगरसेविका आद्या गुमास्ते यांनी मोकाट गुरांच्या प्रश्नाबाबत लक्ष वेधले.भाजपा गटनेते शरद ठुकरूल यांनी वाडीवार रस्त्याचे रूंदीकरण करणे आवश्यक आहे असे सांगीतले. .बीचेस असलेल्या ठीकाणी प्रसाधनगृह, चेजिंग रूम, पाण्याची व्यवस्था तसेच शहरात सुलभ शौचालयाची व्यवस्था आवश्यक असल्याचे दयानंद मांगले यांनी सुचीत केले.यावेळी अॅड.कौस्तुभ मराठे, नगरसेवक संतोष तारी, बुवा तारी, शामल जोशी यांनीही सुचना मांडल्या.
खाड्यांमध्ये नौकानयनसारखे प्रकल्प करणे आवश्यक असल्याचे तसेच देवगड मांजरेकर नाका येथे सर्कलची आवश्यकता असल्याचे वैभव बिडये यांनी सुचीत केले.
चांगले रस्ते तसेच पाणी या मुलभूत सुवीधांची आवश्यकता आहे याकडे निशीकांत साटम आणि विलास रूमडे यांनी लक्ष वेधले.देवगड शहरात रस्त्यालगत मासळी विक्रेत्या महीला बसत असून यासाठी अद्ययावत मासळी मार्केटची गरज आहे अशी सुचना विजय कदम यांनी केली.