कणकवली दि.१३ फेब्रुवारी(भगवान लोके)
तालुक्यातील बोर्डवे येथील श्रीदेवी कालिका मंदिरमध्ये शुक्रवारी (ता.१६) रथसप्तमी उत्सव होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यात १६ रोजी सकाळी अभिषेक, पूजा, आरती, दुपारी महाप्रसाद, त्यानंतर ओटी भरणे कार्यक्रम, रात्री श्रीदत्त भजन मंडळ आणि श्री कालिका तरूण मंडळ कासारवाडी, राधानगरी यांचे भजन होणार आहे. तर रात्री नऊ नंतर विविध गुणदर्शनाचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री अकरा वाजता पारितोषिक वितरण आणि मान्यवरांचा सत्कार आणि त्यानंतर वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचे पौराणिक नाटक सादर होणार आहे.
शनिवारी सकाळी अभिषेक, लघुरूद्र, महिलांचा तिळगूळ समारंभ, सकाळी दहा वाजता कासार समाज, श्री कालिका देवी देवस्थान कमिटी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा, दुपारी महाआरती आणि महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.