आचरा, दि.१३ फेब्रुवारी (अर्जुन बापर्डेकर)
जेष्ठ नागरिक सेवा संघ आडवली-मालडीची देवदर्शन सहल दि. 5 फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडली. गेले कित्येक वर्ष प्रलंबित असलेली आणि आतुरतेने सर्व जेष्ठ नागरिक वाट बघत होते त्या गणपतीपुळे सह इतर धार्मिक आणि पर्यटन स्थळांची सहलीसाठी सर्वच जेष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी आडिवरे येथील महाकाली मंदिर, कशेळी येथील कनकादित्य मंदिर, पावस श्री स्वरूपानंद स्वामी मठ, रत्नदुर्ग किल्ला, रत्नागिरी मत्स्यालय, गणपतीपुळे मंदिर, नानीज येथील श्री नरेंद्र महाराज मठ इ. स्थळांना भेट दिली. यामध्ये 47 जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते. रात्री उशिरापर्यंत ही सर्व जेष्ठांचा उत्साह कौतुकास्पद होता.
या सहलीमध्ये सहभागी सर्व जेष्ठ नागरिकांच्या चहा-नाश्त्यासाठी श्री. उमाजी कोयंडे, श्री. महादेव चव्हाण यांनी आर्थिक सहकार्य केले.
जेष्ठ नागरिक सेवा संघ आडवली- मालडीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा उपक्रम प्रत्यक्षात येण्यासाठी जेष्ठ नागरिक सेवा संघ आडवली-मालडी चे अध्यक्ष आप्पाजी साटम, उपाध्यक्ष एकनाथ लाड, खजिनदार बाबुराव साटम, सीमा घाडीगांवकर यांसह सर्वच जेष्ठ नागरिकांनी मनापासून मेहनत घेतली.