माघी गणेश जयंती उत्सवानिमित्ताने देवगड किल्ला भक्तांनी फुलला
देवगड,दि.१४ फेब्रूवारी
देवगड किल्ला येथे माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माझी मायबोली, राधानगरी प्रस्तुत ,महाराष्ट्राची परंपरा जागृत ठेवणारा संगीत नृत्याविष्कार “गाथा महाराष्ट्राची” या कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष नंदकुमार घाटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी ट्रस्ट उपाध्यक्ष शिवराम निकम,सचिव अशोक।गोळवणकर,खजिनदार केदार तेली,सदस्य गुरुनाथ वाडेकर,राजेश निकम,रमेश कोयंडे, प्रवीण गोळवणकर,यशवंत भोवर,चेतन कोयंडे, संतोष प्रभू,तसेच अन्य सदस्य,ग्रामस्थ उल्हास मणचेकर,रमाकांत आचरेकर,मोहन तेली चंद्रकांत पाळेकर,शरद भाटकर ,संतोष बिर्जे ,आनंद वाडेकर व अन्य उपस्थित होते.
यावेळी मोठ्या संख्येने देवगड तालुक्यातील शिवप्रेमींनी देवगड किल्ला येथे हजेरी लावून माझी मायबोली, राधानगरी प्रस्तुत ,महाराष्ट्राची परंपरा जागृत ठेवणारा संगीत नृत्याविष्कार “गाथा महाराष्ट्राची” या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.