आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांच्या प्रमुख उपस्तितीत आंबोली युनियन इंग्लिश स्कूल चा वार्षिक स्नेह समारंभ संपन्न

सावंतवाडी ,दि.१४ फेब्रुवारी 
आंबोली हाय स्कूल मध्ये सालाबाद प्रमाणे माघी गणेश जयंती उत्सव व वार्षिक स्नेह समारंभ संपन्न झाला.
या समारंभ साठी आंबोली युनियन इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक श्री मोरे , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश गावडे व संस्थेचे सचिव श्री विष्णू चव्हाण ,संस्था पदाधिकारी, आंबोली मुख्य गावकर श्री शशिकांत गावडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वा कार्यकारिणी,आजी माजी विद्यार्थी, आंबोली पोलीस पाटील सौ विद्या चव्हाण,पत्रकार बंधू,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

या वेळी मुलांचे रांगोळी स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस वितरनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते
या वेळी आंबोली चे सरपंच सौ सावित्री पालेकर,जगविख्यात शिक्षक श्री.सावंत , आंबोली तील कोल्हापूर येथे स्टाईक शिक्षक श्री पाताडे,मुख्याध्यापक श्री मोरे व इतर मान्यवराणी उपस्तिताना मार्गदर्शन केले व संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.