महाराष्ट्रातील बालवैज्ञानिकानी विज्ञान प्रदर्शनात ठेवलेले प्रकल्प महाराष्ट्राला भूषणावह

लवैज्ञानिक राष्ट्रीय पातळीवर सहभागी होवून महाराष्ट्राची मान उंचावतील-मंत्री दिपक केसरकर

सावंतवाडी,दि.१४ फेब्रुवारी 
महाराष्ट्रातील बालवैज्ञानिकानी विज्ञान प्रदर्शनात ठेवलेले प्रकल्प महाराष्ट्राला भूषणावह आहेत. बालवैज्ञानिक राष्ट्रीय पातळीवर सहभागी होवून महाराष्ट्राची मान उंचावतील अशी अपेक्षा शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील मुलाकडे असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन पाहता शिक्षणमंत्री म्हणून मला अभिमान आहे.त्यामुळे राज्यपातळीवर चमकलेल्या छोट्या वैज्ञानिकांनी राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनातही चमक दाखवून महाराष्ट्राची मान उंचावेल असे कार्य करावे अशा शुभेच्छा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या.
तर महाराष्ट्र हे आधुनिक राज्य राहील आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वोत्तम टेक्नॉलॉजी शिक्षण क्षेत्राला देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे असेही मंत्री केसरकर म्हणाले.
सावंतवाडी जिमखाना येथे आयोजित ५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी ते ऑनलाइन पद्धतीने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्य विज्ञान मंडळाच्या संचालिका राधा अतकरी, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, राज्य विज्ञान मंडळाचे अभिव्यक्ता प्रविण राठोड,
भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, प्रा.पी.टी शर्मा, डाॅ. राजेंद्र कांबळे, राजकुमार अवसरे,राजीव नेब,गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, प्रियांका देसाई,वामन तर्फे,डाॅ. रविद्र भास्कर, रामचंद्र आंगणे,विज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग काकतकर, नितीन सांडये, नंदू गावडे, आबा केसरकर, प्रसन्ना शिरोडकर आदी उपस्थित होते.
गेल्या चार दिवस येथील जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या ५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप बुधवारी झाला. संपूर्ण महाराष्ट्रातून दाखल झालेल्या बाल वैज्ञानिक व त्यांनी सादर केलेले विविध प्रयोग संपूर्ण सिंधुदुर्ग वासी आणि अनुभवले गेले चार दिवस जिल्ह्यातील विविध शाळांचे विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देत विज्ञान प्रदर्शनाचा आनंद लुटला दरम्यान या विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपाला शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनीही शुभेच्छा दिल्या त्यांनी मुंबई येथून ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
मंत्री केसरकर म्हणाले, विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन लक्षात घेता त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या पलीकडे जाऊन विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रयोग सादर केले विद्यार्थी वर्ग हे आजूबाजूची परिस्थिती पाहून ते विचार मनात आणून त्यावर अभ्यास करतात हेच या विज्ञान प्रदर्शनातून दिसून आले या ठिकाणी जंगली प्राण्यांपासून शेतीचे होणारे नुकसान व हे नुकसान टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात या संदर्भातील केलेला प्रयोग खरोखरच कौतुकास्पद होता प्लस आपल्याला दिलेली बुद्धी समाजासाठी कशा प्रकारे वापरता येईल हेच विचार विद्यार्थ्यांचे प्रदर्शनातून दिसून आले त्यामुळे मार्गदर्शक शिक्षकांचेही अभिनंदन.
मंत्री केसरकर पुढे म्हणाले महाराष्ट्र राज्य हे आधुनिक राज्य राहिले आहे या ठिकाणी शिक्षण घेताना मुलांना विविध सुविधा मिळाव्यात यासाठी शिक्षण मंत्री म्हणून आपण पहिल्यापासूनच कटिबद्ध आहे कृषी क्षेत्रामध्ये भारताने चांगली घोडदोड केली आहे याचाच एक भाग म्हणजे या ठिकाणी सादर केलेले बालवैज्ञानिकांचे प्रयोग पाहता कृषी मध्ये त्यांनी अधिक कल दाखवला आहे त्यामुळे कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांची आवड वाढण्यासाठी पहिली ते दहावीपर्यंत कृषी हा विषय त्या आवश्यक केला आहे. मुळातच महाराष्ट्रातील मुलांकडे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे याचा आपल्याला अभिमान असून येणाऱ्या काळात या विद्यार्थ्यांना अधिकाधिक वैज्ञानिक दृष्ट्या सोयी उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न असणार आहे. तर मुलांमध्ये असलेले कलागुण ओळखून ज्या मुलाला ज्या क्षेत्रात आवड आहे अशा मुलांना वेगळे करून त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा येणाऱ्या काळात प्रयत्न असणार आहे त्यामुळे मुलांनी आत्तापासूनच आपल्याला नेमकं काय केले पाहिजे यावर भर देऊन ते गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून भविष्यात नोकऱ्या स्वतःला भारतापुरतं मर्यादित न राहता जगभरात आपण पोहोचलं पाहिजे.

चौकट
हॅप्पी सॅटर्डे लवकरच.
शिक्षण घेणारी लहान लहान मुले आनंदी राहण्यासोबतच त्यांच्यातील व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी महाराष्ट्र शासन आता आठवड्याचा प्रत्येक शनिवार हा हॅप्पी सॅटर्डे करण्याच्या विचाराधीन आहे या दिवशी न घेता मुलांना जास्तीत जास्त आनंद येण्यावर भर दिला जाईल त्यांच्यातील कलागुण लक्षात घेता संगीत वकृत्व नाटक आधी गोष्टी त्या त्या क्षेत्रातील लोकांकडून शिकवल्या जाणार आहेत तसेच या गोष्टी मधून दरवर्षी स्पर्धा ही घेण्यात येणार आहे लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी शालेय शिक्षण मंत्री श्री केसरकर यांनी सांगितले.