गव्याने धडक दिल्याने फणसवाडी येथे एका दुचाकीस्वार जखमी

सावंतवाडी ,दि.१४ फेब्रुवारी

गव्याने धडक दिल्याने फणसवाडी येथे एका दुचाकीस्वार जखमी झाला आहे. स्वप्नील श्यामराव कांबळे (वय २९, देऊळवाडी ता. भुदरगड-कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. त्याला वनविभागाच्या पथकाने आंबोली आरोग्य केंद्रात दाखल केले. तसेच पुढील उपचारासाठी त्याला आजरा पाठविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्वप्निल कांबळे हे दुचाकीने जात असताना त्यांना गव्याने धडक दिली. त्यात ते किरकोळ जखमी झाले. यानंतर तिथल्या स्थानिकांनी याबाबत वनविभागाला व पोलिसांना कळवले. यानंतर पोलीस व वनविभागाचे अधिकारी वनक्षेत्रपाल विद्या घोडके आणि वनरक्षक भिंगारदिवे यांनी घटनास्थळी जाऊन त्यांना आंबोली आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टर आदिती पाटकर यांनी त्यांच्यावर उपचार केले. आंबोली आरोग्यकेंद्रात त्यांनी जबाब घेतला आणि वनविभागाने त्यांना आजरा येथे हॉस्पिटल मध्ये पुढील उपचार करण्यासाठी नेऊन सोडले. उपचाराचा खर्च वनविभागाकडून देण्यात येणार आहे.