सावंतवाडी दि.१४ फेब्रुवारी
सावंतवाडी नगरपरिषदेकडुन दि.१ जानेवारी २०२४ पासून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मालमत्ता व पाणीपट्टी कर वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. सावंतवाडी शहरातील सर्व सुजाण नागरीकांना नगरपरिषदेकडून आवाहन करण्यात येत आहे की सर्व नागरीकांनी आपला मालमत्ता कर/पाणीपट्टी वेळेत नगरपरिषद कार्यालयात येवून किंवा वसुली पथक जेव्हा आपल्या घरी येतील तेव्हा भरणा करावी. तसेच कर भरणा केल्याची पावती संबंधीत कर्मचाऱ्याकडून घ्यावी. जे मालमत्ताधारक आपला थकीत मालमत्ता कर किंवा पाणीपट्टी भरणा करणार नाहीत त्यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात येईल व नळकनेक्शन खंडीत करण्यात येईल याची नोंद सर्व नागरीकांनी घ्यावी. नागरीकांनी सदर कारवाई टाळण्यासाठी आपला मालमत्ता व पाणीपट्टी कर वेळेत भरणा करावा असे आवाहन मुख्याधिकारी श्री. सागर साळुंखे यांनी केले आहे.
Home आपलं सिंधुदुर्ग “सावंतवाडी नगरपरिषदतर्फे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणा...