ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघ सावंतवाडी यांच्या वतीने शिवजयंती सोहळा निमित्त श्री सत्यनारायण महापूजा

सावंतवाडी दि.१४ फेब्रुवारी 
ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघ सावंतवाडी यांच्या वतीने शिवजयंती सोहळा निमित्त श्री सत्यनारायण महापूजा दि.१९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजा श्री देव नारायण मंदिर मध्ये होणार आहे असे ऑटो रिक्षा सेनामालक संघ अध्यक्ष महेंद्र सावंत उपाध्यक्ष महादेव बामणे सचिव सदानंद धर्णे आणि खजिनदार जयवंत टंगसाळी यांनी म्हटले आहे. सकाळी आठ वाजता सत्यनारायण महापूजा, नऊ वाजता शिवप्रतिमेचे पूजन, दुपारी बारा वाजता महाआरती व महाप्रसाद ,दुपारी तीन वाजता पासून तीर्थप्रसाद, सायंकाळी सहा वाजता भजनाचा कार्यक्रम श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ कोलगाव हे भजन साजन करणार आहेत.