७ बैल घेऊन जाणाऱ्या गाडीला आंबोली पोलिसांनी घेतले ताब्यात

सावंतवाडी दि.१४ फेब्रुवारी 
आज आजऱ्याच्या दिशेने बिलोरा पिकप मधून ७ बैल घेऊन जाणाऱ्या गाडीला आंबोली पोलीस दुरक्षेत्रावर ताब्यात घेण्यात आले. यामध्ये दोघांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सात बैलांसह बोलोरो पिकप ची किंमत पाच लाख १४ हजार होत असल्याचे पोलीसांनी सांगितले. यामध्ये संभाजी तेली रा.भडगाव कुडाळ व अन्वर खुली रा.पिंगळी कुडाळ या दोघांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे सावंतवाडी पोलीस ठाणे अंमलदार यांनी सांगितले ते आजराच्या दिशेने जात असल्याचे ठाणे अंमलदार श्री जाधव यांनी सांगितले.