कणकवली दि .१४ फेब्रुवारी(भगवान लोके)
कणकवली माऊली नगर येथे दुचाकी व ओमनी यांच्यामध्ये किरकोळ अपघात झाल्यानंतरच्या वादातून शनिवारी मध्यरात्री एका युवकावर कटरने वार झाले होते.कटरने वार करणारा संशयित आरोपी महेंद्र चव्हाण याला अटक पोलिसांनी अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
ओमनी चालक महेंद्र गोपाळ चव्हाण याने दुचाकी चालक गौतम धरमचंद्र हिंदळेकर याच्यावर कटरने छातीवर, पायावर, मांडीवर वार करून जखमी केले होते. तर गौतम याने महेंद्र चव्हाण याच्या हातावर दगड मारून त्याला जखमी केले होते. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून दोघांवर विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल झाला होता. गौतम याच्यावर उपचार सुरू असून महेंद्र चव्हाण याला अटक करण्यात आली आहे.या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील करीत आहेत.