राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रथम क्रमांक प्राथमिक व चॅम्पियन ट्रॉफीचे बक्षीस पटकावणारी कार्तिकी डेहणकर

सावंतवाडी दि.१४ फेब्रुवारी 
सावंतवाडी येथे ५१ वे चार दिवस राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्या प्रदर्शनात बाल वैज्ञानिकांनी मांडलेल्या प्रकल्पात प्रथम क्रमांक प्राथमिक व चॅम्पियन ट्रॉफी (रु.६०००) चे बक्षीस पटकावणारी कार्तिकी डेहणकर, माध्यमिक शाळा घाटंजी जिल्हा यवतमाळ ही आहे.

आज बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला त्यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी ऑनलाईन पद्धतीने शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी श्री.किशोर तावडे,मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मकरंद देशमुख,बालभारतीचे संचालक श्री.कृष्णकुमार पाटील, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूरच्या संचालिका डॉ. राधा अतकरी, व प्रा. डॉ.राजकुमार अवसरे
कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे,शिक्षणाधिकारी, सिंधुदुर्ग श्री. प्रदीप कुमार कुडाळकर,भोसले नॉलेज सिटी कार्याध्यक्ष श्री अच्युत सावंतभोसले, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक,
गटशिक्षणाधिकारी श्रीम.कल्पना बोडके,
जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे,जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर,यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या प्रियांका देसाई आदी उपस्थित होते.

राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन प्रकल्प गटनिहाय विजेते -प्राथमिक विद्यार्थी गट प्रथम कार्तिकी किरण डेहणकर, माध्यमिक कन्या शाळा घाटंजी, जि.यवतमाळ (प्रथम क्रमांक व चॅम्पियन ट्रॉफी विजेती विद्यार्थिनी ),
द्वितीय -अस्मि मोहन साळुंखे, द्वितीय क्रमांक, कॉसमॉस इंग्लिश स्कूल, जिल्हा मुंबई उत्तर
तृतीय -लिनिषा रवींद्र बिसेन, नाशिकराव विद्यालय, सातलवाडा जि.भंडारा तर
वंश विलास मरस्कोल्हे, स्वामी विवेकानंद देवलापार, जिल्हा नागपूर ( दिव्यांग विद्यार्थी प्रथम),आसावरी अशोक असावाले, स्वामी विवेकानंद देवलापार जिल्हा नागपूर (आदिवासी विद्यार्थी प्रथम ) यांनी बक्षीस पटकावले.

या मधील माध्यमिक गट प्रथम -अनिकेत रमेश सुरवाडे, महर्षी व्यास माध्यमिक विद्यालय, वेल्हाळे जिल्हा जळगाव, द्वितीय -अर्थ संजय दुपारे, कर्मवीर विद्यालय नागभीड, जिल्हा चंद्रपूर, तृतीय -नाईशा राहुल छेडा, चिल्ड्रेन्स अकॅडमी, जिल्हा मुंबई पश्चिम, रुशील मिलिंद पाटदिया, एस एम चोकसी हायस्कूल पुणे, (दिव्यांग प्रथम ),कार्तिक दिगंबर पेदेवाड, माध्यमिक आश्रम शाळा आष्टी, जिल्हा यवतमाळ ( आदिवासी प्रथम) यांनी बक्षीस पटकावले.

या मध्ये प्राथमिक शिक्षक गट प्रथम -एल वाय चौरावार, शहीद मिश्रा विद्यालय तिरोडा जिल्हा गोंदिया, द्वितीय -सीमा कवडुजी चौधरी, जि प शाळा कोनोली, जिल्हा यवतमाळ तर माध्यमिक शिक्षक गट प्रथम -रोशन रौफ शेख, गांधी विद्यालय आर्वी जिल्हा वर्धा
द्वितीय -एच ए नालट, जि प भारतीय विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज जिल्हा गोंदिया यांनी बक्षीस पटकावले.

प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर गट प्रथम -भास्कर अनंत भगत, सेंट जोसेफ स्कूल मुंबई पश्चिम, द्वितीय -सहदेव केशव जाधव, नाथ पै ज्ञानप्रबोधिनी, करूळ, जिल्हा सिंधुदुर्ग यांनी बक्षीस पटकावले.