वेंगुर्ला,दि.१४ फेब्रुवारी
गणेश जयंतीचे औचित्य साधून वेंगुर्ला रामेश्वर मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
येथील प्रसिद्ध श्री देव रामेश्वर मंदिरात १० फेब्रुवारी पासून माघी गणेश जयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे. रविवारी शनिदेव वर्धापनदीन तर सोमवारी नागनाथ वर्धापनदीन साजरा करण्यात आला. मंगळवारी गणेश जयंती आणि अंगारक योग असल्याने भाविकांनी सकाळ पासूनच मंदिरात येवून २१ गणपतींचे दर्शन घेतले. सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभही संपन्न झाला. यावेळी पुजण्यात आलेल्या गणपतींचे विसर्जन आज येथील रामेश्वर तलावात आणि साकव पुलाजवळ करण्यात आले. लहान मुलांनी गणपती घेवून मोरयाचा जयघोष केला. गुरुवारी महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे.
फोटोओळी – वेंगुर्ला रामेश्वर मंदिरातील गणपतींचे विसर्जन करण्यात आले.