देवगड,दि.१४ फेब्रुवारी
तांबळडेग गावचे मूळ रहिवाशी प्रशांत पांडुरंग सारंग हे मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत असून सन २०१० ते २०१५ या वर्षात जलद प्रतिसाद (कमांडो) पथकात बजावलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.
मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी प्रशांत सारंग यांनी बजावलेल्या विशेष सेवेला मान्यता देऊन पोलीस आयुक्तांच्या हस्ते विशेष सेवा पदक व सन्मानपत्र बहाल करण्यात येणार होते परंतु पोलीस आयुक्तांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त, संरक्षण व सुरक्षा मुंबई यांच्या हस्ते विशेष पोलीस सेवा पदक व सन्मानपत्र प्रशांत सारंग यांना सुपूर्त करण्यात आले आहे,
प्रशांत सारंग हे स. ह. केळकर कॉलेजला असताना मुंबई युनिव्हर्सिटी जनरल चॅम्पियन ट्रॉफी प्रथमच कोकणात आणण्याचा बहुमान मिळविलेला एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू आहे. सध्या ते पोलीस कर्तव्यांबरोबरही खेळामधून मुलांचे करियर घडवण्यासाठी पवन स्पोर्ट्सच्या फाउंडेशनची स्थापना करून करत आहेत
.जागतिक पोलीस स्पर्धा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, स्पर्धा खेळलेले ॲथलेटिक्स खेळाडू म्हणून परिचित आहेत. . प्रशांत सारंग हे देवगड पंचायत समिती माजी सभापती मनोज पांडुरंग सारंग यांचे भाऊ आहेत,
Home आपलं सिंधुदुर्ग प्रशांत सारंग यांचा संरक्षण व सुरक्षा मुंबई पोलीस उपायुक्त यांच्या हस्ते सन्मान