मालवण,दि.१४ फेब्रुवारी
मालवण कुंभारमाठ येथील प्रतिथयश आंबा बागायतदार डॉ उत्तम फोंडेकर यांना हापूस आंब्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्लीत नुकतीच मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आल्या नंतर डॉ श्री. फोंडेकर यांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत यथोचित सत्कार केला.
मालवण कुंभारमाठचे रहिवासी असणारे आंबा बागायतदार डॉ. उत्तम फोंडेकर यांना नुकतीच मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. त्यांच्या या कार्याची दखल कणकवली येथे झालेल्या विकसित समृद्ध सिंधुदुर्ग जिल्हा व भारत या कार्यक्रमात केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांनी घेत श्री. फोंडेकर यांचा कुटुंबियांसह सत्कार केला. त्यावेळी ना. राणे यांनी डॉ. फोंडेकर यांच्या कार्याचा गौरव करताना फोंडेकर यांनी मालवण कुंभारमाठला हापूस आंब्याच्या बाबतीत देवगडच्या बरोबरीत आणून ठेवले आहे. काही अडीअडचणी असल्यास मला हाक द्या मी चांगल्या कार्यासाठी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहीन असे सांगितले. यावेळी डॉ. फोंडेकर यांच्याकडून आंब्या संदर्भात ना. राणे यांनी महत्वाची माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी याबाबत फोंडेकर यांना मौलिक सूचना केल्या.