खोदाईचे काम सुरू असताना अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्यामुळे परप्रांतीय कामगार महिलेचा जागीच मृत्यू

सावंतवाडी,दि.१४ फेब्रुवारी

सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदानासमोर एका इमारतीचे काम सुरू असून या ठिकाणी माती काढताना मातीच्या ढिगारा कोसळल्याने एक कामगार महिला ठार झाली तर दुसरी जखमी झाली या प्रकरणी सावंतवाडी पोलीस चौकशी करत आहेत. बिजापूर येथील कामगार आहेत.
या इमारतीचा कामगार ठेकेदार -गोविंद राठोड यांच्या सह बिजापूर येथील कामगार काम करत होते. ढिगारा कोसळला येथे नवरा, पत्नी व शेजारीण काम करत होती. नवरा व शेजारीण बालंबाल बचावली. सध्या ते सावंतवाडी भटवाडी येथे राहतात.
यामध्ये सौ. शारूबाई गोविंद राठोड (३०) बिजापूर भटवाडी ही जागीच ठार झाली तर
सौ चांदीबाई तिपाना जाधव (३५) ही जखमी झाली. तीच्यावर उपचार सुरू आहेत.या प्रकरणी सावंतवाडी पोलीसांनी मुकादम आणि बिल्डर्स संदेश पटनाईक रा. मातोंड यांच्याकडे घटनास्थळी जाऊन चौकशी सुरू केली आहे. मयत व्यक्तीचा नवरा मातीचा ढिगारा पडला तेव्हा घटनास्थळी होता. त्याने तिला वाचविण्यासाठी प्रयत्न केला पण खड्ड्यात ती अडकुन पडली त्यांनंतर तीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र ती तोवर मृत्यू पावल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. तीच्यावर ढिगारा पडला तेव्हा ती विव्हळत होती पण तोवर मृत्यू झाली.