सिंधुदुर्गनगरी,दि.१४ फेब्रुवारी
आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश स. शेटे हे शुक्रवार दि. 16 फेब्रुवारी 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता आयुष्यमान भारत/ महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची आढावा बैठक. स्थळ, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. सकाळी 11.30 वाजता राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाबाबत आढावा बैठक.स्थळ, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग. दुपारी 12 वाजता राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभुत सुविधांची आढावा बैठक. स्थळ, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद, स्थळ, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग.दुपारी 1 ते 2 वाजता जिल्ह्यातील कार्यरत डॉक्टर्स फ्रेटर्निटी क्लब आणि आय.एम. ए ह्या संस्थांच्या डॉक्टरांसोबत बैठक. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह सिंधुदुर्ग येथे राखीव. सायं.4 वाजता बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था येथे नर्सिग तथा फिजिओथेरपी शाखेच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, कुडाळ. सायं. 7 .30 वाजता भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट व चहापण रात्री 9 वाजता मुक्काम एम.आय.डी.सी शासकीय विश्रामगृह कुडाळ येथे जि. सिंधुदुर्ग