सावंतवाडी दि.१५ फेब्रुवारी
सावंतवाडी सहकारी पतपेढीची निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर चेअरमनपदी रमेश बोंद्रे तर व्हाईस चेअरमन संजू शिरोडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर आर आरवंदेकर यांनी कामा पाहीले.
यावेळी संचालक अँड.गोविंद बांदेकर, श्री. रमेश बोंद्रे, श्री. उमाकांत वारंग, श्री. दत्ताराम सावंत, श्री. शरद सावंत, श्री. चंद्रकांत शिरोडकर, श्री. देवेंद्र तुळसकर, श्री. यल्लापा नाईक श्री. सदानंद जाधव, सौ. सीमा मठकर, सौ. मनिषा मिशाळ, सौ. किशोरी कुडतरकर, श्रीमती वैष्णवी बांदेकर, देवेंद्र नाईक व व्यवस्थापक श्री तेंडूलकर उपस्थित होते.
सावंतवाडी सहकारी पतपेढीची स्थापना सावंतवाडी संस्थानच्या कारकिर्दीत तत्कालीन नृपती पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या प्रेरणेने दि. ३० जुलै १९३२ रोजी झाली. प्रारंभी ही संस्था सावंतवाडी संस्थानातील सेवकांची अर्थात नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी म्हणून स्थापन करण्यात आली होती. या सोसायटीचे अर्थात संस्थेचे पहिले अध्यक्ष सावंतवाडी संस्थानचे त्यावेळचे दिवाण कै. व्ही. बी. चंद्रचूड हे होते. सध्या भारत सरकारचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश श्री. डी. वाय. चंद्रचूड यांचे ते आजोबा होत. १९४७ मध्ये संस्थान विलिन झाल्याने १९५० साली या संस्थेचे सावंतवाडी सहकारी पतसंस्थेत रुपांतर झाले.
सन १९८४ पासून या संस्थेची निवडणूक होत आहे. जवळ जवळ ४० वर्षांनी या संस्थेची प्रथमच निवडणूक बिनविरोध झाली. महिलांना जास्तीत जास्त जागा मिळाव्यात या हेतूने आम्ही आमचे धोरण बदलून संस्थेमध्ये चार जागा या महिलांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. ग्राहक,ठेवीदार व कर्जदारांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे असे नुतन चेअरमन रमेश बोंद्रे यांनी सांगितले.