आजगाव साहित्य कट्ट्यावर मालवणी साहित्य

सावंतवाडी दि.१५ फेब्रुवारी
आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा चाळीसावा मासिक कार्यक्रम रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता आजगाव मराठी शाळेत आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचा विषय ‘मालवणी बोलीभाषेतील साहित्य’ असा असून साहित्य कट्ट्याचे सदस्य ‘मालवणी साहित्यात काय आहे, काय असावं आणि काय नसावं’ याविषयी आपली मते मांडतील.
तरी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी साहित्यप्रेमींनी जरूर उपस्थित रहावे, असे आवाहन साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी केले आहे.