युवासेनेने राबविलेल्या मोतीबिंदू शिबारा नंतर 80 रुग्णांच्या शस्त्रक्रिया यशस्वी

दुसऱ्या टप्प्यात फणसगांव व वैभववाडी येथील रुग्णांवर शस्त्रक्रिया

कणकवली दि .१५ फेब्रुवारी(भगवान लोके)

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या माध्यमातून युवासेनेतर्फे कणकवली विधानसभा मतदार संघात घेण्यात आलेल्या मोतीबिंदू शिबिरातील 80 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या. दुसऱ्या टप्प्यात फणसगांव व वैभववाडी येथिल रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. युवासेनेच्या माध्यमातून “संकल्प दृष्टीदानाचा” या हेतूने कणकवली विधानसभा मतदार संघात शिरगांव, फणसगांव, कलमठ, वैभववाडी, कनेडी व पडेल या 6 ठिकाणी मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर पार पडले होते.या शिबिराच्या सांगता समारंभाला खासदार विनायक राऊत देखील उपस्थित होते. राऊत साहेबांनी या युवासेनेच्या कार्याचे कौतुक केले. यात 1000 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 240 रुग्णांना मोतीबिंदू आढळून आले होते त्यातील 140 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. यातील पहिल्या टप्प्यात शिरगांव,कलमठ व कनेडी येथील 60 रुग्णांवर व आता दुसऱ्या टप्प्यात फणसगांव व वैभववाडी येथील 80 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यासाठी शिवसेना-युवासेनेच्या सर्व तालुकाप्रमुखांनी, कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली. यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडल्या बद्दल युवासेनेच्या या कार्याचे संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कौतुक होत आहे. नागरिकांमधून देखील युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे आभार मानले जात आहेत.
यावेळी शस्त्रक्रिये साठी रुग्णांन सोबत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक तसेच पोंभुर्ले माजी सरपंच सादिक डोंगरकर व आधी नातेवाईक उपस्थित होते.