कणकवली सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंत्यांच्या विरोधातील आंदोलन स्थगित

अधीक्षक अभियंत्यांनी दिले लेखी पत्र ; मनाई आदेश असल्याने पोलिसांनी परशुराम उपरकर यांना आंदोलन थांबवण्याची केली विनंती

कणकवली दि.१५ फेब्रुवारी(भगवान लोके)

कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या सखोल चौकशीसाठी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन छेडण्यात आले.जिल्ह्यात मनाई आदेश लागू असल्याने पोलिसांनी आंदोलन थांबवण्याची विनंती केली.तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी श्री.उपरकर यांना लेखी पत्र दिले. त्यात आपल्याशी चर्चा करुन श्री.सर्वगोड यांच्या विरोधात असलेल्या तक्रारी बद्दल वरिष्ठ कार्यालयात अहवाल पाठवण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.त्यामुळे कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या विरोधातील ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले .

मालवणात नौसेना दिनानिमित्त अनेक विकास कामे झाली.त्या कामांची आणि कणकवली रेल्वे स्थानक व रस्ते सुशोभीकरण कामांसंदर्भात कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची चौकशी व्हावी, यासह अन्य मागण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद सांडव,प्रसाद गावड़े, दीपक गावडे, बाबल गावडे, राजेश टंगसाळी, आप्पा मांजरेकर, आशिष सुभेदार, मंदार नाईक, संदीप लाड,अमित इब्राहीमपूरकर व विल्सन गिरकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.