सावंतवाडी दि.१५ फेब्रुवारी
दुर्मिळ अशा बाॅम्बे ब्लड ग्रुप चे सव्वा तीन वर्षात ३८ बॅग राजाराम गोविंद गावडे (६७) यांना उपलब्ध करून देण्यात आले होते.त्यांचे निधन झाले. सिंधुरक्त मित्र संघटनेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे अशी माहिती अध्यक्ष प्रकाश तेंडूलकर व सचिव किशोर नाचणोलकर यांनी दिली.
राजाराम गावडे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली,जावई,भाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. बाॅम्बे ब्लड दुर्मिळ आहे त्या गटाचा शोध घेत राजाराम गावडे (नांदोस) यांना तब्बल ३८ वेळा उपलब्ध करून दिले त्यासाठी सचिव किशोर नाचणोलकर यांनी विशेष मेहनत घेतली. दुर्मिळ गट शोध सिंधुमित्र रक्त संघटनेच्या माध्यमातून घेऊन रूग्णांना उपलब्ध करून देण्यात आले.