लोकप्रतिनिधी ऋषीतुल्य म्हटले गेले यातच आप्पा साहेबांच नावलौकिक-पालकमंत्री नाम.रवींद्र चव्हाण

ऋषीतुल्य स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे जन्मशताब्दी वर्ष शुभारंभ सोहळा

देवगड,दि.१५ फेब्रुवारी (दयानंद मांगले )
माजी आमदार स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे यांनी ग्रामीण भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा विचार रुजविण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी केलेला प्रयत्न व त्यांनी केलेले कार्य हे निश्चितपणे अतुलनीय असून ग्रामीण भागात डाव्या व समाजवादी विचारसरणीचा प्रभाव असतानाही उजवी विचारसरणी अप्पासाहेबांनी राबविली व पक्षाची भूमिका विचार घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तो काळ अतिशय अवघड असतानाही लोकांची मने जिंकली व एक प्रभाव लोक माणसात टिकविला. स्वातंत्र्य पूर्वी व नंतर च्या लोकप्रतिनिधी होऊन गेले पण काही लोकप्रतिनिधी हे देवतुल्य म्हटले गेले त्यात आप्पा साहेबांचा नावलौकिक असून देवगड सारख्या कातळ भूभागावर स्वर्ग व रोजगाराची संधी निर्माण करणारा लोकाभिमुख लोकप्रतिनिधी असा ठसा त्यांनी उमटविला.असे सांगून कोकणात माजी आम. स्वर्गीय तात्यासाहेब नातू आ णि आप्पासाहेब गोगटे यांचे कार्य महान असून प्रतीकूल परिस्थितीत संघाचा विचार गावागावात पोहचवला आज संघाच्या विचारसरणीला शंभर वर्षे पूर्ण होताना तो विचार आजही त्याच जोमाने वाढत आहे. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.रवींद्र चव्हाण यांनी जामसंडे येथे स्वर्गीय आम आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी सोहळा शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.
ऋषीतुल्य माजी आमदार स्व.आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्याचा शुभारंभ नाम रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सोहळ्याचे अध्यक्ष माजी आम.डॉ विनय नातू, आम.नितेश राणे, यांच्या उपस्थितीत दीप्रजवलन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सोहळ्याचा शुभारंभ गुरुवारी सकाळी जामसंडे येथील सांस्कृतिक भवनात करण्यात आला. या वेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर ,
,माजी आम. प्रमोद जठार,.बाळ माने ,सौ माने राजन तेली,अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष .प्रभाकर सावंत,जिल्हा सरचिटणीस संदीप साटम.पू.ज.ओगले,.शामकांत काणेकर, भाजप माजी जिल्हाध्यक्ष.विजय मराठे,श्याम कांत काणेकर,,नंदूशेठ घाटे,डॉ.मिलिंद कुलकर्णी,श्रीमती स्नेहलता देशपांडे.प्रकाश राणे,बाळ खडपे,भाजप तालुकाध्यक्ष .संतोष किंजवडेकर,.राजू राऊळ .सुधीर जोशी,चेतन चव्हाण,मंगेश लोके सदाशिव ओगले,.सुधीर जोशी,.वैभव बिडये,प्रकाश गोगटे,महादेव गोठणकर अरुण सोमण,.वैभव बिडये व अन्य उपस्थित होते.
या वेळी मान्यवरांचा तसेच जेष्ठ कार्यकर्ते यांचा सन्मान शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सोहळ्याचे सूत्रसंचालन संजय गोगटे प्रास्तविक अरुण सोमण यांनी केले.
या वेळी माजी आम.राजन तेली ,प्रकाश गोगटे,विजय कुमार मराठे,श्रीमती स्नेहलता देशपांडे माजी आम.अजित गोगटे माजी आम.प्रमोद जठार यांनी आप्पांच्या कार्याचा गौरव करून अप्पांचे कार्य दिपस्तंभासारखे मार्ग दाखविणारे असून साकव जसे दोन वाड्या अथवा दोन गावे जोडतात तसेच आप्पांनी दोन पिढ्या जोडल्या.आहेत अप्पांचे साकव योजनेतून कार्य महान असून नव्याने येणाऱ्या कोकणातील साकव योजनेला आप्पासाहेब गोगटे साकव योजना असे नाव देण्यात यावे असा ठराव या सोहळ्यात घेण्यात यावा असे सूचित केले.
आप्पांचे चिरंजीव प्रकाश गोगटे यानी खावटी कर्ज माफी योजनेच्या प्रतीक्षेत येथील शेतकरी असून ही कर्जमाफी व्हावी या करिता विशेष प्रयत्न करून त्या योजनेला आप्पासाहेब गोगटे खावटी कर्ज माफी योजना म्हणून राबवावी.अशी सुचना केली.
आम.नितेश राणे
आमदार नितेश राणे यांनी आपल्या मार्गदर्शनात विधान कणकवली विधानसभा मतदारसंघात कार्य करीत असताना प्रत्येक गावात स्वर्गीय आप्पांची आठवण काढली जाते हेच आप्पांचे खरे कार्य असून जाणे कुटुंबीयांनी कुठे कुटुंब यांचे असलेले विशेष संबंध हे येथील जनतेला ज्ञात आहेत विकासात्मक कार्य करणे व माणसे टिकवणे हे आप्पांचं महत्त्वाचं कार्य असून अशा पद्धतीने कार्य करीत असताना माणसे टिकविणे व ती जोपासणे अतिशय आवश्यक आहे हेच आप्पांचे कार्य पुढे घेऊन जाणे व कार्यकर्ते ताकद देणे आणि त्यांच्याच मार्गावर आम्ही चाललो आहोत अप्पासाहेब आपल्या गुणांमुळे मोठे झाले मोठ्या लोकांचे आप्पासाहेबांनी गुण आत्मसात करावेत व त्यांनी यशस्वी व्हावे आप्पासाहेबांचा काळ हा अधिक अवघड असतानाही त्यांनी अतुलनीय कार्य करून आजच्या काळात ते कार्य करीत असताना अतिशय सोपा सोप्या पद्धतीने व जलद पद्धतीने होत असले तरी काळातील कार्यकर्त्यांची निष्ठा आजच्या कार्यकर्त्यांनी जोपासणे महत्त्वाचे आहे कार्यकर्ते जमिनीपेक्षा ते टिकविणे अवघड असून आप्पांची खरी श्रीमंती अप्पांनी जोडलेली माणसे हीच आहेत व अशाच पद्धतीने माणसे जोडून सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे व अशा पद्धतीने कार्य केले तर मतदारांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते असे आवर्जून सांगितले.
माजी.आम.बाळ माने
देवगडचे ऋषितुल्य माजी आम. आप्पासाहेब गोगटे आणि गुहागरचे माजी आम. डॉ. तात्यासाहेब नातू यांनी जनसंघ ते भाजपा असा राजकीय प्रवास करीत असताना भाजपचा अनेक कार्यकर्ते घडविले त्यांनी दिलेले संस्कार बीज त्यांचे संस्कार यामुळेच आपण राजकारणात यशस्वी होऊ शकलो. ग्रामीण भागातील स्वर्गीय आम.आप्पा साहेबांचे कार्य हे निश्चितपणे ग्रामीण भागातील जनतेला प्रेरणा देणारे व त्या त्यांच्या आपुलकीचे नाते निर्माण करणारे होते .त्यांच्या कारकिर्दीत या ठिकाणी फळप्रक्रिया मासेमारी त्याचप्रमाणे रस्ते वीज पाणी यासारख्या महत्त्वाच्या योजना प्रश्न मार्गी लागले. आप्पासाहेबांनी जी पायवाट कार्यकर्त्यांसमोर निर्माण केली त्याच पायवाटेवर पाऊल ठेवून आज आम्ही आपण वाटचाल करत आहोत आणि त्याचे फलित आज आपला हा मार्ग जो आप्पासाहेबांनी दाखविला ती पायवाट आज चौपदरी झाली आहे आणि याच यश आगामी काळात आपल्याला दाखवून द्यायचे असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील खासदार हा कमळ चिन्हा वर निवडून आलेला असावा असे सांगून राजकारण व समाजकारण करण्यात देखील आपण यशस्वी झालो निष्ठावंत कार्यकर्त्यांवर होता कामा नये या पुढील काळात खऱ्या अर्थाने भाजपच्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी येथील खासदार कमळ चिन्हावर निवडून द्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.
माजी आम. डॉ. विनय नातू यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नातू आणि गोगटे कुटुंब यांचे दोन तपातील संबंध व त्यांचा राजकीय प्रवास आप्पांचे अनुभव कथन करत असताना आप्पा विषयी कार्यकर्त्यांना आलेले अनुभव ते एकत्र पुणे संकलित करण्यात यावेत अशी सूचना केली .
उपस्थितांचे आभार भाजपा जिल्हा कार्यकारी सदस्य वैभव बिडये यांनी मानले .